deepika padukone announces next film the intern hindi adaption with rishi kapoor | दीपिका पादुकोण लागली पुढच्या तयारीला, केली घोषणा

दीपिका पादुकोण लागली पुढच्या तयारीला, केली घोषणा

ठळक मुद्दे‘द इंटर्न’ हा हॉलिवूड सिनेमा 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता.

दीपिका पादुकोणचा ‘छपाक’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. दीपिकाने प्रोड्यूस केलेला हा पहिला चित्रपट होता. दीपिकाच्या या सिनेमाने समीक्षकांनी  कौतुक केले. पण बॉक्स ऑफिसवर मात्र या चित्रपटाने दीपिकाची निराशा केली. ‘छपाक’ रिलीज होण्यास काही दिवस उरले असताना जेएनयूमध्ये दीपिकाने लावलेल्या हजेरीचा एक अंकही यादरम्यान गाजला. याचा जोरदार फटका ‘छपाक’ला बसला. पण म्हणून थांबेल ती दीपिका कुठली? आता तिने पुढची घोषणा केलीय. होय, तिच्या आगामी सिनेमाची.


आपल्या इन्स्टा स्टोरीमधून दीपिकाने तिच्या पुढच्या चित्रपटाची घोषणा केली आहे. हॉलिवूडमध्ये गाजलेल्या ‘द इंटर्न’ या चित्रपटाच्या हिंदी रीमेकमध्ये दीपिका पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे, दीपिकाचा एक्स बॉयफे्रन्ड रणबीर कपूर याचे पापा व ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर हेही तिच्यासोबत दिसणार आहेत.  रणबीर कपूरबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर एवढ्या वर्षांनी पहिल्यांदाच दीपिका ऋषी कपूर यांच्याबरोबर काम करत आहे.


‘द इंटर्न’ हा हॉलिवूड सिनेमा 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. रॉबर्ट डीनिरो आणि अ‍ॅन हाथवे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या हलक्या फुलक्या चित्रपटाने हॉलिवूडमध्ये सगळ्यांनाच वेड लावले होते. हा चित्रपट एका 70 वर्षांच्या पात्राभोवती फिरतो. निवृत्तीनंतर ऑनलाईन फॅशन वेबसाईटमध्ये इंटर्न म्हणून तो दाखल होतो. ही भूमिका ऋषी कपूर साकारणार आहेत. तर  दीपिका त्यांच्या बॉसच्या भूमिकेत दिसेल.  2021 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
जेएनयूमध्ये हजेरी लावल्यानंतर दीपिकाने अनेकांचा रोष ओढवून घेतला होता. या पार्श्वभूमीवर अनेकांनी तिच्या ‘छपाक’ या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याच्या घोषणाही केल्या होत्या. अर्थात. काहींनी तिच्या धाडसाचे कौतुकही केले होते. 

Web Title: deepika padukone announces next film the intern hindi adaption with rishi kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.