'दंगल' गर्ल फातिमा सना शेख अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी करायची 'हे' काम?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 06:08 PM2019-01-16T18:08:21+5:302019-01-16T18:09:15+5:30

आज करिअरमध्ये यशस्वीरित्या वाटचाल करत असताना फातिमा आपले स्ट्रगलही विसरलेली नाही. त्यामुळे  संघर्षाचा काळच फातिमाला  भविष्यात आणखी चांगलं काम करण्याची नवी प्रेरणा आणि बळ  देते असे फातिमा सांगयला विसरत नाही.

'Dangal' Girl Fatima Sana Sheikh fatima sana sheikh first job | 'दंगल' गर्ल फातिमा सना शेख अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी करायची 'हे' काम?

'दंगल' गर्ल फातिमा सना शेख अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी करायची 'हे' काम?

googlenewsNext

सेलिब्रिटी मंडळींवर रसिक जीव ओवाळून टाकतात. रसिकांचं या सेलिब्रिटींवर मनापासून प्रेम असतं. रसिकांच्या या प्रेमामुळेच सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या करिअरमध्ये कोट्यवधींची कमाई करतात. दर महिन्याला सेलिब्रिटी गलेलठ्ठ कमाई करतात. करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना होणा-या कमाईचा आकडा पाहून अनेकांना धक्काही बसतो.  हे ध्येय साध्य करण्यासाठी त्यांना किती संघर्ष करावा लागला याची आपल्याला जाणीव नसते. आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारी दंगल गर्ल फातिमा सना शेखलाही संघर्ष काही चुकलेला नाही.'दंगल' सिनेमातून अभिनेत्री फातिमा सना शेखने बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळ ओळख निर्माण केली आहे.

फातिमाने 'दंगल' सिनेमात आमीर खानच्या मुलीची भूमिका केली होती व तिच्या भूमिकेची सगळीकडून खूप प्रशंसा झाली होती. त्यानंतर फातिमा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिच्यासोबत आमीर खान, अमिताभ बच्चन व कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होते.

मात्र जेव्हा तिच्याकडे काम नव्हते  तेव्हा कुठेही जाण्यासाठी तिला पायी चालत  जावे लागायचे. तसेच पैसे कमवण्यासाठी तिने फोटोग्राफीचेही काम केले होते. अॅक्टींग करिअर सुरू होण्याआधी ती लग्न समारंभात जाऊन त्यांचे फोटो काढायची. त्यातून तिची थोडी कमाई व्हायची. मात्र अभियक्षेत्रातील स्ट्रगलही तिने सुरूच ठेवला होता.

आपले काम सांभाळत तिने  अभिनय क्षेत्राकडे जास्त लक्ष दिले आणि त्यानंतर आपल्या मेहनतीने 'दंगल' सिनेमात काम करण्याची संधी मिळवली. मिळालेल्या संधीचे सोने करत फातिमानेही आपल्या भूमिकेने रसिकांची पसंती मिळवली. आज करिअरमध्ये यशस्वीरित्या वाटचाल करत असताना फातिमा आपले स्ट्रगलही विसरलेली नाही. त्यामुळे संघर्षाचा काळच फातिमाला  भविष्यात आणखी चांगलं काम करण्याची नवी प्रेरणा आणि बळ  देते असे फातिमा सांगयला विसरत नाही.

Web Title: 'Dangal' Girl Fatima Sana Sheikh fatima sana sheikh first job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.