बॉलिवूडचा अभिनेता व गायक दलजीत दोसांझचे नवे गाणे 'काइली + करीना' नुकतेच प्रदर्शित झाले आहे. हे गाणे फेमस स्टुडिओ अंतर्गत सादर करण्यात आले आहे. हे गाणे दलजीतच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. 

गायक व अभिनेता दलजीत दोसांझने गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये विविध भूमिकांतून रसिकांना भुरळ पाडली आहे. त्याने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. त्याचा फॅन फॉलोविंगदेखील खूप आहे. त्याचे काइली जेनरवर क्रश असल्याचे सांगण्यासाठी तो अजिबात लाजत नाही.

तसेच त्याने त्याची 'उडता पंजाब' व आगामी 'गुड न्यूज' सिनेमातील सहकलाकार करीना कपूरदेखील आवडत असल्याचे सांगितले आहे. नुकतेच त्याने त्याचे नवीन गाणे 'काइली प्लस करीना' इंस्टाग्रामवर प्रदर्शित केले आहे. 

सध्या दलजीत दोसांझकडे दोन मोठे प्रोजेक्ट आहेत. एक म्हणजे 'अर्जुन पटियाला' आणि दुसरा 'गुड न्यूज'. सध्या तो कलर्स टिव्हीवरील रिएलिटी शो 'राइजिंग स्टार'मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पहायला मिळतो आहे. या व्यतिरिक्त तो पंजाबी चित्रपट साडामध्ये नीरू बाजवासोबत दिसणार आहे. हा सिनेमा २१ जूनला प्रदर्शित होणार आहे. 


तर हिंदी सिनेमा 'अर्जुन पटियाला'मध्ये दलजीत दोसांझ कृति सेनॉन व वरूण शर्मा दिसणार आहे. हा सिनेमा १३ सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र आता हा सिनेमा १९ जुलै, २०१९ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित जुगराजने केले आहे.

याशिवाय दलजीत अक्षय कुमार व करीना कपूरसोबत 'गुड न्यूज' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात कियारा आडवाणीदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Daljeet dosanjh's new song 'Kaili + Kareena' released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.