क्रिकेटर के. एल. राहुल करतोय आलिया भटच्या मैत्रिणीला डेट, हा घ्या पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 01:30 PM2019-07-08T13:30:26+5:302019-07-08T13:31:19+5:30

क्रिकेटर के. एल. राहुलचं बॉलिवूडच्या वेगवेगळ्या अभिनेत्रीसोबत नाव जोडलं जातं आणि या गोष्टीमुळे तो नेहमी चर्चेत असतो.

Cricketer K. L. Rahul is dating Alia Bhat's friend, see this proof | क्रिकेटर के. एल. राहुल करतोय आलिया भटच्या मैत्रिणीला डेट, हा घ्या पुरावा

क्रिकेटर के. एल. राहुल करतोय आलिया भटच्या मैत्रिणीला डेट, हा घ्या पुरावा

googlenewsNext

क्रिकेटर के. एल. राहुलचं बॉलिवूडच्या वेगवेगळ्या अभिनेत्रीसोबत नाव जोडलं जातं आणि या गोष्टीमुळे तो नेहमी चर्चेत असतो. आता आलेल्या वृत्तानुसार के. एल. राहुल अभिनेत्री आलिया भटची मैत्रिण आकांक्षा रंजन कपूरला डेट करतो आहे. या गोष्टीचा पुरावा खुद्द आकांक्षानं दिल्याचंही बोललं जातं आहे.


बऱ्याच कालावधीपासून क्रिकेटर के. एल. राहुलचं नाव वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. आता आलेल्या वृत्तानुसार के. एल. राहुल आलियाची बेस्ट फ्रेंड आकांक्षा रंजन कपूरला डेट करत आहेत. या चर्चेला सुरूवात झाली ती आकांक्षाच्या इंस्टाग्राम स्टोरीनंतर. आकांक्षाने भारत-श्रीलंका वर्ल्ड कप सामान्याचे फोटो शेअर केले. या फोटोत के.एल. राहुल दिसतो आहे. 


के. एल. राहुल भारत व श्रीलंकामध्ये झालेल्या सामन्याचा स्टार होता. त्याने रोहित शर्मासोबत मिळून शतक बनवले होते. भारतानं हा सामना ७ विकेट्सने विजय मिळवला होता. भारताच्या चाहत्यांसोबत आकांक्षादेखील के.एल. राहुलपासून प्रभावित झाली होती. 


आकांक्षाची पोस्ट पाहून त्या दोघांमध्ये अफेयर असल्याच्या वृत्तानं जोर पकडला. दोघे एकत्र डिनर, मुव्हिज व हाऊस पार्टीजमध्ये पहायला मिळतंय.

अथिया क्रिकेटपटू केएल राहुलला डेट करत असल्याची चर्चा मध्यंतरी ऐकायला मिळाली होती. त्यावेळी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी फेब्रुवारीपासून अथिया व केएल राहुल यांनी एकमेकांना डेट करणे सुरु केले. दोघेही अनेकदा बाहेर फिरायला जातात. एका कॉमन फ्रेन्डच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती.

कॉमन फ्रेन्ड आकांक्षा रंजन हिने सोशल मीडियावर एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोत अथिया व केएल राहुल एकत्र दिसत आहे. यावर्षी एप्रिलमध्ये हा फोटो शेअर केला गेला होता.

Web Title: Cricketer K. L. Rahul is dating Alia Bhat's friend, see this proof

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.