भज्जी दुसर्‍यांदा बाबा होणार! गीता बसराने सुंदर फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 04:01 PM2021-03-14T16:01:52+5:302021-03-14T16:02:56+5:30

गीताने काही सुंदर फोटो शेअर करत आई होणार असल्याची बातमी दिली.

cricket harbhajan singh going to become father for second time wife geeta basra share photo | भज्जी दुसर्‍यांदा बाबा होणार! गीता बसराने सुंदर फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

भज्जी दुसर्‍यांदा बाबा होणार! गीता बसराने सुंदर फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

googlenewsNext
ठळक मुद्देहरभजनने गीताला ‘वो अजनबी’ गाण्यात पहिल्यांदा बघितले होते आणि ती त्याला आवडली होती.

क्रिकेटपटू हरभजन सिंग दुसर्‍यांदा बाबा होणार आहे. होय, हरभजनची पत्नी गीता बसरा दुसर्‍यांदा बाळाला जन्म देणार आहे. गीताने काही वेळापूर्वी ही गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली.
या कपलला पाच वर्षांची मुलगी आहे. आता हे कपल दुसर्‍यांदा आईबाबा होणार आहेत. गीताने काही सुंदर फोटो शेअर करत आई होणार असल्याची बातमी दिली. यात हरभजन, गीता व त्यांची मुलगी हिनाया असे तिघे आहेत. लवकरच मी मोठी बहीण होणार आहे, असे टी-शर्ट हातात पकडून क्यूट हिनाया आई-बाबांकडे बघून आनंद साजरा करतेय. एका फोटोत चिमुकली हिनाया आईच्या बेबी बम्पचे चुंबन घेताना दिसतेय. जुलै 2021 मध्ये हरभजन व गीताच्या बाळाचा जन्म होणार आहे.

गीता एक अभिनेत्री आहे. 2006 मध्ये आलेल्या इमरान हाश्मीचा सिनेमा ‘दिल दिया है’मधून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर 2007 मध्ये ती पुन्हा इमरानसोबत ‘द ट्रेन’मध्ये झळकली होती.

हरभजनने गीताला ‘वो अजनबी’ गाण्यात पहिल्यांदा बघितले होते आणि ती त्याला आवडली होती. युवराज सिंगच्या मदतीने त्यांने गीताचा नंबर शोधला. गीताला मेसेज करत तिला कॉफी डेटवर बोलवले होते. 
गीताने 3 ते 4 दिवस त्याच्या मेसेजचा रिप्लॉय दिला नव्हता. यानंतर दोघांची पहिली भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि या मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले.  2015 मध्ये हरभजन आणि गीताने मोठ्या धुमधडाक्यात लग्न केले होते.

Web Title: cricket harbhajan singh going to become father for second time wife geeta basra share photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.