COVID-19 lockdown: Actress Soundarya Sharma turns T-shirt into mask PSC | परदेशात मास्क मिळत नसल्याने या अभिनेत्रीने घरीच बनवला मास्क; मास्क, ग्लोव्हजचा परदेशातही तुटवडा

परदेशात मास्क मिळत नसल्याने या अभिनेत्रीने घरीच बनवला मास्क; मास्क, ग्लोव्हजचा परदेशातही तुटवडा

ठळक मुद्देअभिनेत्री सौंदर्या शर्माने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत ती सांगत आहे की, सध्या या शहरात मास्कचा तुटवडा आहे. त्यामुळे मास्क घरच्या घरी बनवणे हा एकच उपाय आहे.

कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून या साथीला महारोगराई घोषित करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केला आहे. त्यामुळे २१ दिवस देशातील सगळेच कामकाज ठप्प झाले आहे. केवळ भारतातच नव्हे तर अनेक देशांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणं बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे एक अभिनेत्री सध्या लॉस एंजिलिसमध्ये अडकली आहे. या अभिनेत्रीची अवस्था अतिशय वाईट असून या शहरात साधं मास्क देखील मिळत नसल्याचे तिने सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे.

अभिनेत्री सौंदर्या शर्माने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत ती सांगत आहे की, सध्या या शहरात मास्कचा तुटवडा आहे. त्यामुळे मास्क घरच्या घरी बनवणे हा एकच उपाय आहे. टी-शर्ट, ओढणी यांच्या साहाय्याने तुम्ही मास्क बनवू शकता... मी देखील अनेक प्रयत्नांनंतर हा मास्क बनवला आहे. तसेच या पोस्टसोबत तिने लिहिले आहे की, काल २० दिवसांनंतर घरातील सामान आणण्यासाठी बाहेर पडले होते. बाहेर मास्क आणि ग्लोव्हज अजिबातच उपलब्ध नाहीयेत. त्यामुळे स्कार्फ अथवा तोंडावर रूमाल बांधून स्वतःचा बचाव करा... एखाद्या आगीप्रमाणे कोरोना व्हायरस पसरत आहे. काही अतिशय महत्त्वाचे असेल तरच घराच्या बाहेर पडा... अन्यथा घरातच थांबा... घरासारखी दुसरी सुरक्षित जागा कोणतीही नाहीये...

सौंदर्याने अनुपम खेर यांची निर्मिती असलेल्या रांची डायरीज मध्ये काम केले आहे. तिने खूपच कमी काळात बॉलिवूडमध्ये आपले नाव कमावले आहे. ती एका कामाच्या निमित्ताने लॉस एंजिलिसला गेली होती. 

Web Title: COVID-19 lockdown: Actress Soundarya Sharma turns T-shirt into mask PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.