'मी थांबवू शकलो नाही अश्रू', ऐश्वर्या आणि आराध्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे भावूक झाले बिग बी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 12:01 PM2020-07-28T12:01:06+5:302020-07-28T12:01:44+5:30

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन व तिची लेक आराध्या बच्चन यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे अमिताभ बच्चन भावूक झाले.

Couldn't Hold Back Tears," Writes Amitabh Bachchan After Daughter-In-Law Aishwarya Is Discharged From Hospital | 'मी थांबवू शकलो नाही अश्रू', ऐश्वर्या आणि आराध्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे भावूक झाले बिग बी

'मी थांबवू शकलो नाही अश्रू', ऐश्वर्या आणि आराध्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे भावूक झाले बिग बी

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन व तिची लेक आराध्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली. ही माहिती खुद्द अभिषेक बच्चन याने ट्विटरवर दिली. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ट्विट केले ज्यात त्यांनी मी अश्रू थांबवू शकलो नाही असे म्हटले.


अभिषेक बच्चनने ट्विट केले की, तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थना व आशीर्वादासाठी धन्यवाद. मी नेहमी तुमचा ऋणी राहिन. ऐश्वर्या व आराध्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे आणि त्यांना हॉस्पिटलमधून रजा मिळाली आहे. आता ते घरी राहणार आहेत. मी आणि वडील हॉस्पिटलमध्येच मेडिकल स्टाफच्या देखभालीत राहणार आहोत.


आता आराध्या व ऐश्वर्याला हॉस्पिटलमधून डिस्जार्च मिळाल्यावर अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केले आहे. खरेतर त्या दोघींची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर अमिताभ बच्चन भावूक झाले आणि त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, माझी छोटी मुलगी आणि सूनेला हॉस्पिटलमधून रजा मिळाल्यावर माझे अश्रू थांबवू शकलो नाही. देवा तुझी कृपा अपार, अपरम्पार.

अमिताभ बच्चन यांचे हे ट्विट सोशल मीडियावर खूप व्हायरल होते आहे आणि या ट्विटवर लोक प्रतिक्रियादेखील देत आहेत.
कालच अमिताभ बच्चन यांनी रुग्णालयातून एक पोस्ट शेअर केली होती. कोरोना रुग्णांवर कसे उपचार केले जातात, याची माहिती त्यांनी पोस्टमधून दिली होती. 'कोरोना रुग्णांना रुग्णालयात वेगळ्या वॉर्डमध्ये ठेवण्यात येतं. त्यामुळे तो कित्येक दिवस इतरांना पाहू शकत नाही. डॉक्टर आणि परिचारिका येतात. औषधं देतात. मात्र ते कायम पीपीई किटमध्ये असतात. कोणत्याही रुग्णाला त्याच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा चेहरा पाहता येत नाही,' अशा शब्दांत अमिताभ यांनी त्यांचा अनुभव शेअर केला होता.

अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन यांना वैद्यकीय देखरेखीखाली असून त्यांना याच आठवड्यात डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. अभिषेक आणि अमिताभ यांना ११ जुलैला कोरोनाची लागण आली. यानंतर दुसऱ्याच दिवशी ऐश्वर्या आणि आराध्या यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. या दोघींना सुरुवातीला होम क्वारंटाईनमध्ये राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानंतर त्यांना १७ जुलैला नानावटीमध्ये दाखल करण्यात आलं.

Web Title: Couldn't Hold Back Tears," Writes Amitabh Bachchan After Daughter-In-Law Aishwarya Is Discharged From Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.