Corona Virus: भयानक राधिका तरीही गेली लंडनला, एरअपोर्टवरचा घेतला आढावा, सद्यस्थीती पाहून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 12:42 PM2020-03-20T12:42:23+5:302020-03-20T12:50:40+5:30

राधिका आपटे मात्र लंडना निघाली आहे. होय, नेहमीच तिचे लंडन ते मुंईत -पुणे असा ती प्रवास करत असते. राधिकाचा पती हा लंडनमध्ये राहत असल्यामुळे तिचे येणे जाणे असते.

Coronavirus Pandemic: Radhika Apte shares her immigration Experience at Heathrow Airport-SRJ | Corona Virus: भयानक राधिका तरीही गेली लंडनला, एरअपोर्टवरचा घेतला आढावा, सद्यस्थीती पाहून व्हाल हैराण

Corona Virus: भयानक राधिका तरीही गेली लंडनला, एरअपोर्टवरचा घेतला आढावा, सद्यस्थीती पाहून व्हाल हैराण

googlenewsNext

कोरोनाच्या प्रकोपामुळे जणू संपूर्ण जग थांबले आहे. या व्हायरसने आत्तापर्यंत 6 हजारांवर लोकांचा जीव घेतला असून आत्तापर्यंत दीड लाखांवर लोकांना या व्हायरसची लागण घातली आहे. भारतातही हा व्हायरस वेगाने फोफावत आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचे शूटींग रद्द करण्यात आले आहे. अनेक चित्रपटांच्या रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.


अनेक बॉलिवूड आणि मराठी सेलिब्रेटींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या व्हायरस बाबत काळजी घ्या अशा आशयाच्या पोस्ट शेअर केल्या आहेत. ज्यात प्रियांका चोप्रा, सलमान खान, अक्षय कुमार, कतरिना कैफ, सुबोध भावे, मिथिला पालकर, स्वप्नील जोशी इत्यादी कलाकारांचा समावेश आहे. यांत मराठी कलाकारही सोशल मीडियाद्वारे कोरोनाबाबत जनजागृती करताना दिसतायेत.


अशात राधिका आपटे मात्र लंडना निघाली आहे. होय, नेहमीच तिचे लंडन ते मुंईत -पुणे असा ती प्रवास करत असते. राधिकाचा पती हा लंडनमध्ये राहत असल्यामुळे तिचे येणे जाणे असते. कामा निमित्त राधिका भारतात राहते.मुळची पुण्याची असेलली राधिकाने सिनेइंडस्ट्रीत तिचे एक स्थान निर्माणे केले आहे. तुर्तास तिने व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने तिचा अनुभव सागितला आहे. तिने म्हटले आहे की, दोन दिवसांपूर्वी लंडनवरुन भारतात आले त्यावेळी फ्लाइट रिकामी होती. मात्र आता परत जाताना मात्र पूर्ण विमान भरलेलं होतं.  इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडेही युके बॉर्डर बंद होण्याविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती.हीथ्रो एक्सप्रेस पूर्णपणे रिमाकी होता. पॅडिंगटनमध्ये मोठ्या मुश्किलीनं कोणतरी दिसत होतं.

Web Title: Coronavirus Pandemic: Radhika Apte shares her immigration Experience at Heathrow Airport-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.