अनुष्का शर्माने उडवली स्वत:च स्वत:ची खिल्ली, विश्वास बसत नसेल तर पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 09:58 AM2020-04-05T09:58:10+5:302020-04-05T09:59:50+5:30

बोर हो रहे होंगे, चलो थोडा हंस लो...

coronavirus lockdown anushka sharma trolled herself on quarantine time see here meme of actress |   अनुष्का शर्माने उडवली स्वत:च स्वत:ची खिल्ली, विश्वास बसत नसेल तर पाहा!

  अनुष्का शर्माने उडवली स्वत:च स्वत:ची खिल्ली, विश्वास बसत नसेल तर पाहा!

googlenewsNext
ठळक मुद्देअनुष्का व विराट कोहली दोघेही सध्या सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत.

लॉकडाऊनच्या काळात बॉलिवूडचे सर्व स्टार्स सोशल मीडियावर कधी नव्हे इतके अ‍ॅक्टिव्ह आहेत. केवळ अ‍ॅक्टिव्ह नाहीत तर जमेल त्या पद्धतीने चाहत्यांचे मनोरंजनही करत आहेत. काही थ्रोबॅक फोटो शेअर करत आहेत, तर काही डान्स, वर्कआऊट व्हिडीओ शेअर करत आहेत तर काही चाहत्यांसोबत चॅट करत आहेत. पण अभिनेत्री अनुष्का शर्माने आपल्या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी वेगळाच मार्ग निवडला आहे. होय, स्वत:च स्वत:ला ट्रोल करून चाहत्यांना हसण्याची संधी तिने दिली आहे.
अनुष्काने स्वत:वरचेच काही फनी मीम शेअर केले आहेत. लॉकडाऊनच्या काळात लोकांना हसण्याची संधी हवी आहे. मग काय, अनुष्काने ही संधी दिली. स्वत:वरचेच एक मीम तिने शेअर केले. 

या मीममध्ये दोन फोटो आहेत. एक ग्लॅमरस आणि दुसरा ‘सुई धागा’ या चित्रपटातील लूकचा. ग्लॅमरस फोटो म्हणजे, लॉकडाऊनचा पहिला दिवस आणि ‘सुई धागा’मधील फोटो म्हणजे, लॉकडाऊनच्या 21 व्या दिवशी झालेली स्थिती, असे हे मजेदार मीम आहे. ‘बोर हो रहे होंगे, चलो थोडा हंस लो,’ असे हे मीम शेअर करताना अनुष्काने लिहिले आहे.

स्वत:च स्वत:ची खिल्ली उडवणे, हे सोपे काम नाही़ यासाठी मोठी हिंमत लागते, हे तर तुम्ही जाणताच. अनुष्कात ही हिंमत आहे, असेच तिने शेअर केलेले हे मीम बघून म्हणावे लागेल. ‘सुई धागा’ या चित्रपटाच्यावेळी अनुष्कावर सोशल मीडियावर मीम्सचा जणू पूर आला होता. या चित्रपटातील अनुष्काने साकारलेल्या भूमिकेवरून असंख्य मीम्स शेअर केले गेलेत. अनुष्काची कधी नव्हे इतकी खिल्ली उडवली गेली. पण अनुष्काने कधीच त्यावर आक्षेप घेतला नाही. तिने अतिशय खिलाडू वृत्तीने स्वत:वरचे जोक्स, मीम्स एन्जॉय केलेत. लॉकडाऊनच्या काळातही चाहत्यांच्या मनोरंजनासाठी ती हेच करतेय.

अनुष्का व विराट कोहली दोघेही सध्या सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. दोघेही एकमेकांसोबत क्वालिटी टाईम घालवत आहेत. यादरम्यानचे अनेक फोटो दोघांनी शेअर केले आहेत.

Web Title: coronavirus lockdown anushka sharma trolled herself on quarantine time see here meme of actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.