CoronaVirus: Lata Mangeshkar also donates 25 lakhs for fight to Corona TJL | CoronaVirus : कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी लता मंगेशकरही पुढे सरसावल्या, दिला इतका निधी

CoronaVirus : कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी लता मंगेशकरही पुढे सरसावल्या, दिला इतका निधी

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान मांडले आहे. त्यात देशातही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालल आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा केली. यासोबतच त्यांनी पीएम केअर फंडमध्ये डोनेशन देण्यासाठी लोकांना विनंती केली. हा फंड आपातकालीन परिस्थितीत व लोकांच्या कामासाठी व उपचारासाठी वापरला जातो. त्यांनी मदतीची हाक देताच उद्योगपतींसोबत बॉलिवूड व मराठी सेलिब्रेटीही पुढे सरसावले. त्यात आता भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीदेखील कोरोनाशी लढण्यासाठी मदतीचा हात दिला आहे. ही माहिती खुद्द त्यांनीच ट्विटरवर दिली आहे.

लता मंगेशकर यांनी ट्विट केले की, नमस्कार.आपण आपल्या सरकारला या कठिण प्रसंगी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. मी माझ्या तर्फ़े मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २५ लाख रुपये देत आहे. माझी सर्वांना नम्र विनंती आहे की सरकारच्या कोरोना विरोधी लढ्यात आपण सुद्धा सरकारला यथाशक्ति मदत करावी.  जगभरातील जवळपास सर्वच देश कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. रविवारी सकाळी 6 लाख 63 हजार 541 जणांना संसर्ग झाल्याची पुष्टी झाली. तर 30, 873 लोकांचा मृत्यू झाला आहे. यादमरम्यान 1 लाख 42 हजार 175 रुग्ण ठीक झाले आहेत. युरोपात मृतांचा आकडा 20 हजारांपेक्षा अधिक झाला आहे. या महत्त्वाच्या वेळी आपल्या पंतप्रधानांना सहकार्य करण्यासाठी बरेच कलाकार पुढे आले आहेत. रजनीकांत यांच्यापासून अक्षय कुमारपर्यंत, देशातील दिग्गज व्यक्ती व सेलिब्रेटी आपलं कर्तव्य पार पाडत आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus: Lata Mangeshkar also donates 25 lakhs for fight to Corona TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.