कोरोनामुळे शूटींग रद्द;  दीपिका पादुकोण घरी बसून काय करतेय पाहाच...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 10:25 AM2020-03-16T10:25:36+5:302020-03-16T10:25:41+5:30

बॉलिवूड कलाकारांना देखील कोरोनामुळे मोठा फटका बसला आहे.

corona virus deepika padukone share her image to cleaning wardrobe-ram |  कोरोनामुळे शूटींग रद्द;  दीपिका पादुकोण घरी बसून काय करतेय पाहाच...

 कोरोनामुळे शूटींग रद्द;  दीपिका पादुकोण घरी बसून काय करतेय पाहाच...

googlenewsNext
ठळक मुद्दे कोरोनामुळे शूटींग, इव्हेंट रद्द झाले आहेत. बाहेर कोरोनाचा धोका आहे. अशात अनेक कलाकारांनी घरात वेळ घालवण्याचा मार्ग पत्करला आहे.

कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले असताना सामान्य जनजीवनही प्रभावित झाले आहे. सुमारे 100 देशांना कोरोनाचा फटका बसला आहे. चित्रपट आणि एकंदरित मनोरंजन व्यवसायाला देखील याचा जोरदार फटका बसला आहे. अनेक  चित्रपटांचे, मालिकांचे शूटिंग रद्द करण्यात आले असून बहुतांश चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तातडीच्या कामाशिवाय घरातून बाहेर न पडण्याचे निर्देश देण्यात आल्यामुळे बॉलिवूड कलाकारांनाही घरात बसून राहण्याची वेळ आलीय. आता दीपिकाचेच बघा, कोरोनाचा धोका लक्षात घेता तिने घरात राहण्याचा निर्णय घेतला आहे. पण हा रिकामा वेळ तिने चांगलाच सत्कारणी लावला आहे.

होय, दीपिकाने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती वार्डरोबची स्वच्छता करताना दिसत आहे. Productivity in the time of COVID-19, असे कॅप्शन देत तिने हा फोटो शेअर केला आहे.


 कोरोनामुळे शूटींग, इव्हेंट रद्द झाले आहेत. बाहेर कोरोनाचा धोका आहे. अशात अनेक कलाकारांनी घरात वेळ घालवण्याचा मार्ग पत्करला आहे. या पार्श्वभूमीवर काल प्रियंका चोप्रानेही असाच एक फोटो शेअर केला होता. यात ती मोकळ्या वेळेत आपल्या लाडक्या डॉगीसोबत खेळताना दिसली होती.
  किंग खान शाहरुखची मुलगी सुहाना खानने देखील आपले काही फोटो शेअर केले होते. सुहाना खान सध्या अमेरिकेत अडकून पडली आहे. घरातून बाहेर पडणे शक्य नसल्यामुळे तिला रडू कोसळले होते. अत्यंत दु:खी, खिन्न असे  फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.  

Web Title: corona virus deepika padukone share her image to cleaning wardrobe-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.