Corona Virus : खोटा निघाला अमिताभ बच्चन यांचा ‘सेल्फ आयसोलेशन’चा दावा!! वाचा काय आहे सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 12:48 PM2020-03-19T12:48:45+5:302020-03-19T12:49:10+5:30

शिक्क्यामागचे सत्य उघड!!

Corona Virus : amitabh bachchan claims of being in self isolation is false know the truth-ram | Corona Virus : खोटा निघाला अमिताभ बच्चन यांचा ‘सेल्फ आयसोलेशन’चा दावा!! वाचा काय आहे सत्य

Corona Virus : खोटा निघाला अमिताभ बच्चन यांचा ‘सेल्फ आयसोलेशन’चा दावा!! वाचा काय आहे सत्य

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी स्वत:ला घरात कोंडून घेतले आहे.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप टाळण्यासाठी जगभरात वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. भारतातही वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. अशात काल महानायक अमिताभ बच्चन सेल्फ आयसोलेशनमध्ये गेल्याची बातमी आली. पुढील काही दिवस अमिताभ सेल्फ आयसोलेशनमध्ये राहतील, असे सांगितले गेले. अमिताभ यांच्या एका ट्वीटच्या आधारावर हा दावा केला गेला. या ट्वीटसोबत अमिताभ यांनी एक हाताचा फोटो शेअर केला होता.

या हातावर स्टॅम्प लागलेला होता आणि या स्टॅम्पमध्ये सेल्फ आयसोलेशन अर्थात क्वारंटाइन होण्याबद्दल लिहिले होते. बीएमसीने अमिताभ यांच्या हातावर हा शिक्का मारल्याचे म्हटले गेले होते. पण आता या शिक्क्यामागचे सत्य उघड झाले आहे.


होय, अमिताभ यांनी शेअर केलेला हातावरच्या शिक्क्याचा सेम फोटो बीएमसीनेही आपल्या एका ट्वीटमध्ये शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अमिताभ यांनी हाच फोटो आपल्या ट्वीटमध्ये पोस्ट केला होता. पण हा फोटो शेअर करताना आपण सेल्फ आयसोलेशनमध्ये जातोय, असे काहाही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले नव्हते. त्यांनी ट्वीट केले. त्यात सेल्फ आयसोलेशनचा उल्लेखही केला. पण हा उल्लेख केवळ जनजागृतीसाठी होता, असे आता स्पष्ट झाले आहे. 

(अमिताभ यांनी शेअर केलेला फोटो)                                                    ( बीएमसीने शेअर केलेला फोटो)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी स्वत:ला घरात कोंडून घेतले आहे. ऐरवी शूटींगमध्ये बिझी असलेले स्टार्स घरात वेळ घालवत आहेत. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी कोरोनापासून बचावासाठी स्वत:च आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. अनुप जलोटा लंडनवरून मुंबईत परतल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना काही दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. 
 

Web Title: Corona Virus : amitabh bachchan claims of being in self isolation is false know the truth-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.