म्हणून थिएटरमध्ये सिंगल स्क्रीन रिलीज होऊ शकणार नाही वरुण धवन आणि साराचा 'कुली नंबर 1'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 05:30 PM2020-12-16T17:30:00+5:302020-12-16T17:30:03+5:30

वरुण धवन आणि सारा अली खानचा 'कुली नंबर 1' लवकरच ओटीटी प्लॉटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Coolie no 1 wont release in single screens amazon prime vetoes the decision | म्हणून थिएटरमध्ये सिंगल स्क्रीन रिलीज होऊ शकणार नाही वरुण धवन आणि साराचा 'कुली नंबर 1'

म्हणून थिएटरमध्ये सिंगल स्क्रीन रिलीज होऊ शकणार नाही वरुण धवन आणि साराचा 'कुली नंबर 1'

googlenewsNext

वरुण धवन आणि सारा अली खानचा 'कुली नंबर 1' लवकरच ओटीटी प्लॉटफॉर्मवर रिलीज होणार आहे. अ‍ॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणारा 'कुली नंबर1' थिएटरमध्ये सिंगल स्क्रीनवर सुद्धा रिलीज होईल असा अंदाज लावला जात होतो. वरुण धवन आणि सारा अली खानचा 'कुली नंबर1' हा एक मनोरंजक आणि मसाला असलेला सिनेमा आहे, त्यामुळे  प्रेक्षकांना थिएटरमध्ये आकर्षित करेल. पण दुर्दैवाने आता हे शक्य होणार नाही.


बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार सिनेमांशी संबंधीत सूत्रांनी सांगितले, “मल्टीप्लेक्स कधीही सिनेमा ओटीटी आणि थिएटरमध्ये एकाच वेळी रिलीज होईल यासाठी तयार नाही. मात्र सिंगल स्क्रीनच्या मालकांचे असे काही म्हणणे नव्हते. कारण त्यांना वाटते की, त्यांचा टार्गेट ऑडियन्स हा सिनेमा ऑनलाइन सिनेमा पाहणारा नाही आहे त्यामुळे ओटीटी आणि सिंगल स्क्रीनवर 'कुली नंबर 1' रिलीज झाल्यास आनंद होईल.  हा मुद्दा लक्षात घेऊन सिंगल स्क्रीन मालक, वरुण धवन, दिग्दर्शक डेव्हिड धवन, निर्माता वशु भगनानी आणि अ‍ॅमेझॉन प्राइम यांच्यात चर्चा सुरू झाली. अ‍ॅमेझॉनने यावर विचार करण्यासाठी काही वेळ मागितला होता."

रिपोर्टनुसार, “पण काही दिवसांनी अ‍ॅमेझॉन प्राइमच्या टीमने हे स्पष्ट केले की, हा सिनेमा फक्त अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झाला पाहिजे. अ‍ॅमेझॉन प्राइमने सांगितले की त्यांनी ओटीटी प्रीमिअरसाठी निर्मात्यांना मोठ्या प्रमाणात पैसे दिले आहेत. मेकर्सनी मेझॉन प्राइमच्या टीमला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यात यश मिळाले नाही.  

१९९५ साली रिलीज झालेल्या कुली नंबर १चा हा रिमेक असून यात वरूण धवन आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २५ डिसेंबरला अ‍ॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे.

Web Title: Coolie no 1 wont release in single screens amazon prime vetoes the decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.