Comedian Manjunath Naidu died while performing on stage | स्टेजवरच झाला कॉमेडियनचा मृत्यू, परफॉर्मन्स समजून प्रेक्षकांनी वाजवल्या टाळ्या  
स्टेजवरच झाला कॉमेडियनचा मृत्यू, परफॉर्मन्स समजून प्रेक्षकांनी वाजवल्या टाळ्या  

ठळक मुद्देमंजूनाथ वडीलांसोबतचे काही किस्से सांगत होता. याच वेळी त्याने त्याच्या एंजाइटीबाबतही सांगितले. पण यानंतर क्षणात तो कोसळला.

होय, तो दुबईतील एका हॉटेलात स्टेज परफॉर्मन्स करत होता. त्याच्या प्रत्येक वाक्यावर टाळ्यांचा कडकडाट सुरु होता. त्याच्या प्रत्येक पंचवर लोकांना हसू आवरत नव्हते. याचदरम्यान तो खुर्चीवर बसला आणि नंतर खाली कोसळला.  पाहणाºयांना तोही परफॉर्मन्स वाटला आणि लोक आणखी जोरात हसू लागले. पण  काही वेळानंतर तो अजिबात हालचाल करत नसल्याचे लक्षात आले आणि त्याच्या जवळ गेल्यावर त्याचा मृत्यू झाल्याचे सर्वांना कळले... एखाद्या चित्रपटात शोभावी अशीच ही घटना प्रत्यक्षात घडली.  भारतीय कॉमेडियन मंजूनाथ नायडू याचा याच स्थितीत दुर्दैवी मृत्यू झाला. आजूबाजूला शेकडो लोक असताना कुणीही त्याला वाचवू शकले नाही.


खलीज टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार,  36 वर्षीय मंजूनाथचा शुक्रवारी ‘अल बरशा’ या दुबईतील हॉटेलात स्टेज शो सुरु होता. 2 तासांचा हा शो पाहण्यासाठी अनेकजण हॉटेलात जमले होते. याचदरम्यान शोच्या अखेरच्या टप्प्यात मंजूनाथला हृदय विकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. परफॉर्म करत असताना अचानक तो खुर्चीवर बसला आणि नंतर खाली पडला. मंजूनाथ खुर्चीवरून खाली पडल्यावर प्रेक्षक पोट धरून हसू लागले. कारण हा त्याच्या परफॉर्मन्सचाच एक भाग असल्याचा प्रेक्षकांचा समज झाला. पण काही वेळानंतर मंजूनाथ काहीही हालचाल करत नसल्याचे सर्वांच्या लक्षात आले. काही जण त्याच्या जवळ गेल्यावर त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले.  
मंजूनाथचा जवळचा मित्र मिरादाद याने सांगिल्यानुसार, शो अंतिम टप्प्यात होता.   मंजूनाथ वडीलांसोबतचे काही किस्से सांगत होता. याच वेळी त्याने त्याच्या एंजाइटीबाबतही सांगितले. पण यानंतर क्षणात तो कोसळला. मंजूनाथ कॉमेडी करतोय, असाच सर्वांचा समज झाला. तो स्टेजवर कोसळल्यानंतर 20 मिनिटांनी त्याला मदत मिळाली. पण तोपर्यंत मंजूनाथ हे जग सोडून गेला होता.


Web Title: Comedian Manjunath Naidu died while performing on stage
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.