प्रभासचा 'साहो' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात त्याच्या अपोझिट श्रद्धा कपूर दिसणार आहे. या सिनेमातून श्रद्धा तेलुगू इंडस्ट्री डेब्यू करतेय. या दोघांचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. साहोमधील 'इन्नी सोनी' या गाण्यातील लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तसेच या चित्रपटातील ‘आयो मेरा सैय्या सायको’ गाणे हे काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले होते. आता या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या पोस्टरवर चंकी पांडे दिसतो आहे. 

चंकी पांडेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टवरुन चंकी चित्रपटात निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे आणि तो साकारीत असलेल्या पात्राचं नाव देवराज असं असणार आहे. या पोस्टरमध्ये चंकी पांडेने चॉकलेटी रंगाचा सूट परिधान केला असून बॅकग्राऊंटमध्ये आग लागल्याचे पाहायला मिळत आहे. 


‘हाऊसफूल २’मध्ये ‘आखिरी पास्ता’ची लोकप्रिय भूमिका साकारल्यानंतर चंकी आता ‘साहो’ चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

या चित्रपटात प्रभास, श्रद्धा आणि चंकी व्यतिरिक्त नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.  

हा चित्रपट तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शित सुजीत करत आहेत.

हा चित्रपट ३० ऑगस्ट, २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 


Web Title: Chunky Pandey becomes a villain in Saaho Movie
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.