'सॉफ्ट टार्गेट आहेत सेलिब्रिटी', रवीना टंडनने अधिकाऱ्यांवर केला हल्लाबोल

By अमित इंगोले | Published: September 26, 2020 10:40 AM2020-09-26T10:40:16+5:302020-09-26T10:40:30+5:30

कलाकारांची नावे समोर आल्यानंतर अभिनेत्री रवीना टंडनला असं वाटतं की, ड्रग्स प्रकरणात सेलिब्रिटी सॉफ्ट टार्गेट आहेत. आणि हा तपास केवळ फिल्म इंडस्ट्री पुरताच लिमिटेड राहू नये.

Celebrities are soft targets says Raveena Tandon on drug chat probe | 'सॉफ्ट टार्गेट आहेत सेलिब्रिटी', रवीना टंडनने अधिकाऱ्यांवर केला हल्लाबोल

'सॉफ्ट टार्गेट आहेत सेलिब्रिटी', रवीना टंडनने अधिकाऱ्यांवर केला हल्लाबोल

googlenewsNext

(Image Credit : deccanherald.com)

बॉलिवूड सेलिब्रिटीचं ड्रग चॅट समोर आल्यानंतर या केसमध्ये अनेक मोठ्या लोकांची चौकशी झाली आहे आणि अनेक मोठ्या स्टार्सची चौकशी  होणार आहे. सिनेमा आणि टीव्हीवरील कलाकारांची नावे समोर आल्यानंतर अभिनेत्री रवीना टंडनला असं वाटतं की, ड्रग्स प्रकरणात सेलिब्रिटी सॉफ्ट टार्गेट आहेत. आणि हा तपास केवळ फिल्म इंडस्ट्री पुरताच लिमिटेड राहू नये.

रवीना टंडन ट्विटमध्ये लिहिले की, 'लोकल अधिकाऱ्यांचा आशीर्वादाशिवाय कोणतंही ड्रग सप्लाय होऊ शकत नाही. जे मोठे मासे आहेत त्यांना कुणीही प्रश्न विचारत नाही. जर एक पत्रकार स्टिंगमधून एका सप्लायरपर्यंत पोहोचू शकतो तर मग अधिकाऱ्यांना याबाबत कसं काही माहीत नसतं? सेलिब्रिटी सॉफ्ट टार्गेट आहेत'.

आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये रवीनाने संपूर्ण देशभरात ड्रग्स विरोधात मोहिम चालवण्याची गरज असण्यावर जोर देत लिहिले की, 'सप्लायर्स कॉलेज, शाळा, पब, रेस्टॉरन्टच्या बाहेर फिरत असतात. ड्रग्स इंडिकेटमध्ये अनेक शक्तिशाली अधिकारी सहभागी असतात जे पैसे घेऊन डोळे बंद ठेवतात आणि तरूणांना उद्ध्वस्त होऊ देतात. हे मुळापासून संपवा. इथेच थांबू नका तर संपूर्ण देशात ड्रग्स विरोधात लढा सुरू करण्याची घोषणा करा'.

याआधी ड्रग्स चॅटमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे आल्यावर ट्विट करत रवीनाने लिहिले होते की, 'आता सफाईची वेळ आली आहे. कौतुकास्पद पाऊल. आपण आपल्या येणाऱ्या पिढ्यांची मदत करू. इथूनच सुरूवात करा, यानंतर निश्चितपणे इतरही क्षेत्राकडे वळा. हे मूळापासून संपवा. जे दोषी वापरणारे, डीलर्स आणि सप्लायर्स असतील त्यांना शिक्षा द्या. याचा फायदा घेणारे मोठे लोक निशाण्यावर आहे. जे दुसऱ्यांचा विचार न करता त्यांचं जीवन खराब करत आहेत'.

हे पण वाचा :

दीपिकावर शर्लिन चोप्राचा निशाणा, म्हणाली - जर 'माल' घेतला नाही तर मग.....

धर्मा प्रॉडक्शनच्या क्षितिज प्रसादला NCB ने ताब्यात घेताच करण जोहरने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला...

श्रद्धा कपूरच्या नावे कारमध्ये सप्लाय व्हायचे ड्रग्ज, करमजीतने साराबद्दलही केला मोठा खुलासा!!

Web Title: Celebrities are soft targets says Raveena Tandon on drug chat probe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.