संपूर्ण जगभराचे लक्ष कान्स फेस्टिव्हलने वेधून घेतले आहे. नुकतेच या फेस्टिव्हलला सुरूवात झाली आहे. या फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर आपली झलक दाखवण्यासाठी बॉलिवूडमधील अभिनेत्री सज्ज झाल्या आहेत. त्यात अभिनेत्री मल्लिका शेरावतचेदेखील नाव चर्चेत आहे. मल्लिकादेखील कान्समध्ये सहभागी होण्यासाठी खूपच उत्सुक आहे. या तयारीचा व्हिडिओ मल्लिकाने आपल्या सोशल मीडियावर नुकताच शेअर केला आहे.


या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मल्लिका निळ्या रंगाच्या गाऊनमध्ये पहायला मिळते आहे. यात ती खूपच सुंदर दिसते आहे. या गाऊनला टोनी वार्डने डिझाईन केला असून ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

मल्लिका या कान्स फिल्म फेस्टिव्हल २०१९ मध्ये सहभागी होण्याकरिता १७ मे रोजी फ्रान्सच्या कान्स शहरात रवाना होणार आहे. २० मे रोजी मल्लिका रेड कार्पेटवर आपल्याला ग्लॅमरस अंदाजात पहायला मिळणार आहे. तसेच तिने मागील वर्षीचाही कान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.


यंदाच्या कान्स फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या राय बच्चन, दीपिका पादुकोण, सोनम कपूर, हुमा कुरैशी, हिना खान, कंगना रनौत आणि डायना पेंटी रेड कार्पेटवर रॅम्प वॉक करीत संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेताना दिसणार आहेत. 


मल्लिकाने २००३ साली ख्वाहिश चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिचा २००४ साली प्रदर्शित झालेल्या मर्डर सिनेमातून ती लोकप्रिय झाली. मर्डर चित्रपट हॉलिवूडचा सुपरहिट सिनेमा अनफेदफुलचा हिंदी रिमेक आहे.२००५मध्ये मल्लिकाने जॅकी चॅनसोबत द मिथमध्ये काम केले . त्यानंतर २००७ मध्ये प्रदर्शित झालेला गुरू चित्रपटातील मैया मैया गाण्यातून तिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. त्यानंतर वेलकम चित्रपटात ती दिसली.

मल्लिका शेरावत तुषार कपूरसोबत वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. ही हॉरर कॉमेडी वेबसीरिज असणार असून वेगळ्या अंदाजात मल्लिका दिसणार आहे. 


Web Title: Cannes 2019: Mallika Sherawat does this for cannes preparation, see Video
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.