Bunty Aur Babli 2 Trailer : 'बंटी अँड बबली इज बॅक'; Rani Mukerji आणि Saif Ali Khan च्या Bunty Aur Babli 2 चा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 05:00 PM2021-10-25T17:00:26+5:302021-10-25T17:02:21+5:30

Bunty Aur Babli 2 Trailer Released: रानी मुखर्जी आणि सैफ अली खानच्या अपकमिंग 'बंटी और बबली 2' या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाला आहे. यानंतर फॅन्सची उत्सुकता अजून वाढली आहे.

bunty aur babli 2 trailer rani mukerji saif ali khan siddhant chaturvedi sharvari starrer bunty aur babli 2 trailer release | Bunty Aur Babli 2 Trailer : 'बंटी अँड बबली इज बॅक'; Rani Mukerji आणि Saif Ali Khan च्या Bunty Aur Babli 2 चा ट्रेलर रिलीज

Bunty Aur Babli 2 Trailer : 'बंटी अँड बबली इज बॅक'; Rani Mukerji आणि Saif Ali Khan च्या Bunty Aur Babli 2 चा ट्रेलर रिलीज

googlenewsNext
ठळक मुद्दे२००५ मध्ये रिलीज झालेल्या बंटी और बबली या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे.

Rani Mukerji And Saif Ali Khan Bunty Aur Babli 2 Trailer: बॉलिवूडचा (Bollywood) अॅक्टर सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि रानी मुखर्जी (Rani Mukerji) स्टारर फिल्म 'बंटी और बबली 2' (Bunty Aur Babli 2) चा ट्रेलर सोमवारी रिलीज करण्यात आला. या फिल्मचा ट्रेलर ३ मिनिटं ११ सेकंदांचा आहे. या ट्रेलरवरून हा चित्रपट कसा असेल याचा अंदाज बांधता येऊ शकतो. हा चित्रपट २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), रानी मुखर्जी (Rani Mukerji) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या चित्रपटाचा सिक्वेल आहे. यावेळी मात्र अभिषेक बच्चनच्या जाही सैफ अली खान दिसणार आहे.

'बंटी और बबली 2' यशराज फिल्म्सच्या (Yashraj Films) बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. यावेळी चित्रपटात दोन जोड्या दिसतील. एक सैफ अली खान, राणी मुखर्जी आणि दुसरी जोडी ती म्हणजे सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि शर्वरी. बंटी आणि बबली यांच्याच्या नावाने सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी अनेकांना लुटतात. त्यानंतर त्या ठिकाणच्या पोलिसांना पुन्हा एकदा बंटी आणि बबली सक्रीय झाल्याचं वाटतं. यानंतर या चित्रपटाची खरी आणि मजेदार कथा सुरू होते. 

बंटी और बबली 2 या चित्रपटाचं दिग्दर्शन वरूण शर्मानं केलं आहे. हा चित्रपट यापूर्वीच प्रदर्शिक होणार होता. परंतु कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचं रिलीज टाळण्यात आलं होतं. हा चित्रपट आता १९ नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाईल. पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) या चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: bunty aur babli 2 trailer rani mukerji saif ali khan siddhant chaturvedi sharvari starrer bunty aur babli 2 trailer release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.