#BoycottSadak2 होतोय ट्रेंड, आलिया भटच्या 'सडक 2'ला रिलीज होण्याआधीच होतोय तीव्र विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 11:55 AM2020-06-30T11:55:59+5:302020-06-30T11:56:45+5:30

'सडक 2' चित्रपट रिलीज होण्याआधीच सोशल मीडियावर #BoycottSadak2 ट्रेंड होऊ लागला आहे.

# BoycottSadak2 is a trend, even before the release of Alia Bhatt's 'Sadak 2' | #BoycottSadak2 होतोय ट्रेंड, आलिया भटच्या 'सडक 2'ला रिलीज होण्याआधीच होतोय तीव्र विरोध

#BoycottSadak2 होतोय ट्रेंड, आलिया भटच्या 'सडक 2'ला रिलीज होण्याआधीच होतोय तीव्र विरोध

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त व पूजा भटचा सडक 2 चित्रपट हॉटस्टारवर रिलीज होणार असल्याची काल घोषणा करण्यात आली. मात्र हा चित्रपट रिलीज होण्याआधीच सोशल मीडियावर #BoycottSadak2 ट्रेंड होऊ लागला. ट्विटरवर #BoycottSadak2 लिहून या चित्रपटाला विरोध करत आहे. युजर्स महेश भट व आलियावर निशाणा साधत या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याबद्दल बोलत आहेत. 

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिझमचा वाद पुन्हा जोर धरू लागला. सुशांतच्या निधनानंतर फक्त चाहतेच नाही तर कलाकारदेखील इंडस्ट्रीतील राजनीतीबद्दल बोलू लागले. नेपोटिझमबद्दल बऱ्याच कलाकारांनी आपलं मत मांडले. कुणी त्याला विरोध करतेय तर कुणी त्याच्या बाजूने. या वादात स्टार किड्सवरही टीका होऊ लागली. त्यात सुशांतच्या निधनानंतर महेश भट व त्यांचा भाऊ मुकेश भट यांनी अशा काही गोष्टींचा खुलासा केला. त्यामुळे सुशांतचे चाहते नाराज झाले आहेत. याच कारणामुळे सडक 2च्या रिलीजला विरोध करत आहेत आणि लोकांना या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यास सांगत आहेत.

सडक 2 चित्रपट महेश भट यांनी दिग्दर्शित आणि निर्मिती मुकेश भटने केली आहे. हा चित्रपट 10 जुलैला रिलीज होणार होता. मात्र आता कोरोनामुळे हा चित्रपट हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.

हा चित्रपट पूजा भट व संजय दत्त यांच्या सडकचा सीक्वल आहे.

सडक 2मध्ये आलिया भट व आदित्य रॉय कपूर रोमांस करताना दिसणार आहेत. सडक 2ची कथा वेगळी असल्याचे सांगितले जात आहे.

Read in English

Web Title: # BoycottSadak2 is a trend, even before the release of Alia Bhatt's 'Sadak 2'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.