नहीं उठने देंगे तुफान...! फरहान अख्तरचा सिनेमा रिलीजपूर्वीच वादात, #boycottToofan होतेय ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 10:35 AM2021-03-11T10:35:29+5:302021-03-11T10:36:30+5:30

‘तुफान’वर बहिष्कार का? वाचा काय आहे कारण

boycott toofan trends on twitter as netizens raised issue of sushant singh rajput death and farhan akhtar remark on caa protests | नहीं उठने देंगे तुफान...! फरहान अख्तरचा सिनेमा रिलीजपूर्वीच वादात, #boycottToofan होतेय ट्रेंड

नहीं उठने देंगे तुफान...! फरहान अख्तरचा सिनेमा रिलीजपूर्वीच वादात, #boycottToofan होतेय ट्रेंड

googlenewsNext
ठळक मुद्देया चित्रपटात फरहान अख्तर बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी फरहानने खूप मेहनत घेतली आहे.

चित्रपट आणि चित्रपटांच्या निमित्ताने होणारे वाद नवे नाहीत. आता आणखी एका चित्रपटावरून वाद उफाळून आला आहे. पुन्हा एकदा या सिनेमावर बहिष्कार घालण्यासाठी सोशल मीडियावर मोहिम सुुरू झाली आहे. या सिनेमाचे नाव काय तर ‘तुफान’. फरहान अख्तरचा ‘तुफान’ हा सिनेमा येत्या 21 मे रोजी अ‍ॅमेझॉन या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतोय. बुधवारी अ‍ॅमेझॉनने याची अधिकृत घोषणा केली आहे. फरहानने सुद्धा आपल्या सोशल अकाऊंटवर याची माहिती दिली आणि यानंतर ट्विटरवर #boycottToofan ट्रेंड होऊ लागले.

आता ‘तुफान’वर बहिष्कार का? तर या सिनेमाच्या रिलीजआधी नव्याने सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचा मुद्दा त्याच्या चाहत्यांनी उचलून धरला आहे. सुशांतला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही बॉलिवूडला बायकॉट करू, अशी भूमिका चाहत्यांनी घेतली आहे.

याशिवाय फरहानने सीएएला विरोध केला होता, त्या पार्श्वभूमीवरही काही लोकांनी फरहानच्या चित्रपटाला विरोध चालवला आहे.

‘तुफान’ हा सिनेमा राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केला आहे. यात फरहानशिवाय परेश रावल, मृणाल ठाकूर, सुप्रिया पाठक, हुसैन दलाल असे अनेक कलाकार आहेत.

दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्यासोबत फरहानचा हा दुसरा सिनेमा आहे. याआधी दोघांनी 2013 मध्ये प्रदर्शित ‘भाग मिल्खा भाग’ या सिनेमात काम केले होते.
या चित्रपटात फरहान अख्तर बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी फरहानने खूप मेहनत घेतली आहे. त्याने या भूमिकेसाठी सहा आठवड्यात तब्बल 15 किलो वजन वाढविले होते.

Web Title: boycott toofan trends on twitter as netizens raised issue of sushant singh rajput death and farhan akhtar remark on caa protests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.