Box Office: बधाई हो ! आयुष्यमान खुराणाच्या चित्रपटाचे १०० कोटी पक्के!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 02:34 PM2018-11-01T14:34:38+5:302018-11-01T14:35:43+5:30

अमित शर्मा दिग्दर्शित ‘बधाई हो’ या एका चित्रपटाने आयुष्यमान खुराणा बॉलिवूडचा ए लिस्ट स्टार बनला आहे. यासोबतच इंडस्ट्रीतील १०० कोटी क्लबच्या कलाकारांच्या यादीत प्रवेश करण्यासही तो सज्ज आहे.

  Box Office: badhaai ho box office ayushmann khurranas film collects rs 91 70 in 14 days | Box Office: बधाई हो ! आयुष्यमान खुराणाच्या चित्रपटाचे १०० कोटी पक्के!!

Box Office: बधाई हो ! आयुष्यमान खुराणाच्या चित्रपटाचे १०० कोटी पक्के!!

googlenewsNext

अमित शर्मा दिग्दर्शित ‘बधाई हो’ या एका चित्रपटाने आयुष्यमान खुराणा बॉलिवूडचा ए लिस्ट स्टार बनला आहे. यासोबतच इंडस्ट्रीतील १०० कोटी क्लबच्या कलाकारांच्या यादीत प्रवेश करण्यासही तो सज्ज आहे. होय,  ‘बधाई हो’च्या पहिल्या वीकेंडची कमाई बघता, लवकरच हा चित्रपट १०० कोटींचा आकडा पार करणार, असे दिसतेय.




काही तासांपूर्वी ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श यांनी टिष्ट्वटरवर  ‘बधाई हो’च्या १४ दिवसांच्या कमाईचे आकडे शेअर केलेत. या आकड्यावरून तरी  ‘बधाई हो’ला १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, असे मानले जात आहे. बॉक्सआॅफिसवरच्या ताज्या आकडेवारीनुसार,  ‘बधाई हो’ने पहिल्या आठवड्यात ९१.७० कोटी रूपयांचा बिझनेस केला आहे. गत शुक्रवारी या चित्रपटाने ३.४० कोटी कमावले. यानंतरच्या दिवसांत अनुक्रमे ६.६० कोटी, ८.१५ कोट, २.६० कोटी, २.५० कोटी रूपयांचा गल्ला जमवला. काल बुधवारी या चित्रपटाने २.३५ कोटी कमावून एकूण ९१.७० कोटींचा बिझनेस केला.  रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाद्वारे आयुष्यमानने स्वत:च्याच चित्रपटाचा विक्रम मोडीत काढला होता. होय, ‘बधाई हो’ आयुष्यमानच्या करिअरमधील सर्वात मोठी ओपनर फिल्म ठरली होती.
‘बधाई हो’  हा एका वेगळ्या विषयाला वाहिलेला चित्रपट आहे. नातवंडांना खेळवण्याच्या वयात आयुष्यमानची आई प्रेग्नंट राहते आणि ही गोष्ट जगापासून लपवता लपवता आयुष्यमान रडकुंडीला येतो, अशी याची ढोबळ कथा आहे. मजेदार अंदाजातील ही कथा प्रेक्षकांना प्रचंड भावली आहे. समीक्षकांनीही या चित्रपटाला उत्स्फूर्त दाद दिली आहे. नीना गुप्ता, सान्या मल्होत्रा यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

Web Title:   Box Office: badhaai ho box office ayushmann khurranas film collects rs 91 70 in 14 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.