बोनी कपूर यांची भावुक पोस्ट; म्हणे, ‘हा’ तेलगु चित्रपट श्रीदेवीचा होता आवडीचा चित्रपट!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 06:16 PM2020-05-10T18:16:30+5:302020-05-10T18:18:04+5:30

अभिनेत्री श्रीदेवी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक अजरामर कलाकृती दिल्या आहेत. त्यांची प्रत्येक अदा, हावभाव, सौंदर्य प्रेक्षकांना घायाळ करायचं. मात्र आज श्रीदेवी आपल्यात नाहीत. पण, त्यांचे चित्रपट आजही आपल्याला त्या सोबत असल्याचे भासवतात.

Bonnie Kapoor's passionate post; Says, Telugu movie was Sridevi's favorite movie !! | बोनी कपूर यांची भावुक पोस्ट; म्हणे, ‘हा’ तेलगु चित्रपट श्रीदेवीचा होता आवडीचा चित्रपट!!

बोनी कपूर यांची भावुक पोस्ट; म्हणे, ‘हा’ तेलगु चित्रपट श्रीदेवीचा होता आवडीचा चित्रपट!!

googlenewsNext

बॉलिवूडची हवाहवाई गर्ल अभिनेत्री श्रीदेवी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक अजरामर कलाकृती दिल्या आहेत. त्यांची प्रत्येक अदा, हावभाव, सौंदर्य प्रेक्षकांना घायाळ करायचं. मात्र आज श्रीदेवी आपल्यात नाहीत. पण, त्यांचे चित्रपट आजही आपल्याला त्या सोबत असल्याचे भासवतात. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच तेलगु चित्रपटांतही काम केले आहे. श्रीदेवी यांचे पती निर्माता बोनी कपूर यांनी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी श्रीदेवींच्या आवडत्या चित्रपटाचा उल्लेख केला आहे.

बोनी कपूर यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे की,‘तेलगु चित्रपट ‘जग्देका वीरूडू अतिलोका सुंदरी’ हा श्रीदेवीचा नेहमीच आवडीचा असलेला चित्रपट आहे. ९ मे रोजी या चित्रपटाला ३० वर्षे पूर्ण झालीत. चित्रपटात श्रीदेवींसोबत चिरंजीवी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन कोवेलामुदी राघवेंद्र यांनी केले आहे. या चित्रपटाला दिग्दर्शनातील सर्वाेत्कृष्ट पुरस्कार मिळाला होता. तसेच सर्वाेत्कृष्ट संगीत म्हणून नंदी यांना पुरस्कार मिळाला होता.

या चित्रपटात चिरंजीवी आणि श्रीदेवी यांची जोडी हिट झाली होती. ते दोघे तिसऱ्यांदा एकमेकांसोबत काम करत होते. चिरंजीवी यांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या चित्रपटाचा उल्लेख करत चित्रपटाचा गौरव केला आहे. तसेच श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर ही देखील आईच्या आठवणीत अनेक पोस्ट करत असते.  

Web Title: Bonnie Kapoor's passionate post; Says, Telugu movie was Sridevi's favorite movie !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.