बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याची विराट कमाई; कोहलीला मागे टाकत 'ब्रँड नंबर १'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 01:55 PM2023-03-22T13:55:05+5:302023-03-22T14:03:28+5:30

या अहवालानुसार विराट कोहली गेल्या ५ वर्षांपासून ब्रँड व्हॅल्यू जपत पहिल्या स्थानावर होता.

Bollywood's 'Ranveer singh' actor earns huge; No. 1 overtaking Virat Kohli | बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याची विराट कमाई; कोहलीला मागे टाकत 'ब्रँड नंबर १'

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याची विराट कमाई; कोहलीला मागे टाकत 'ब्रँड नंबर १'

googlenewsNext

मुंबई - क्रिकेच्या मैदानावर विराट कामगिरी करणारा टीम इंडियाचा फलंदाज मार्केटमध्येही चांगलाच भाव खातो. मात्र, आता विराट कोहलीपेक्षा बॉलिवूड अभिनेत्याने अधिक भाव खाल्लाय. एनर्जेटीक मॅन आणि बॉलिवूडचा पेशवा असलेल्या रणवीर सिंगने ब्रँड व्हॅल्यूमध्ये विराटची पिछेहट करत पहिलं स्थान पटकावलंय. कॉर्पोरेट इंवेस्टीगेशन आणि रिस्क कंसल्टिंग फर्म क्रॉलच्या एका रिपोर्टनुसार रणवीर सिंग भारतातील सर्वात श्रीमंत कलाकार ठरला आहे. तर, विराट कोहलीला दुसऱ्या स्थानावर जावे लागले आहे. 

या अहवालानुसार विराट कोहली गेल्या ५ वर्षांपासून ब्रँड व्हॅल्यू जपत पहिल्या स्थानावर होता. मात्र, यावेळी, रणवीर सिंगने विराटला मागे टाकले. या यादीत बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार तिसऱ्या स्थानावर असून अलिया भट्ट चौथ्या तर दीपिका पदुकोण ५ व्या क्रमांकावर आहे. 

कॉर्पोरेट इंवेस्टीगेशन आणि रिस्क कंसल्टिंग फर्म क्रॉलच्या एका रिपोर्टनुसार रणवीर सिंग भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता ठरला आहे. क्रॉल सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्ट २०२२ मध्ये रणवीर सिंगची ब्रँड व्हॅल्यू १८१.७ मिलियन डॉलर एवढी दर्शवत आहे. तर, क्रिकेटर विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू २०२२ साली १७६.९ मिलियन डॉलर असल्याचे दिसून येते. यावरूनच रणवीर सिंगने आता कोहलीला ब्रँड व्हॅल्यूमध्ये मात दिल्याचे स्पष्ट होत आहे. या यादीत अक्षय कुमार तिसऱ्या स्थानावर आहे. रणवीर सिंगची ब्रँड व्हॅल्यू २९.१ टक्क्यांनी वाढली असून, २०२१ मधील त्याची व्हॅल्यू १५८.३ मिलियन डॉलरपेक्षा अधिक आहे. दरम्यान मागील ५ वर्षांपासून विराट कोहली भारतातील सर्वात मूल्यवान सेलिब्रिटी होता.

 

दरम्यान, रणवीरचा ‘रॉकी राणी की प्रेमकहाणी’ हा आगामी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असून या सिनेमात तो मुख्य भूमिकेत झळकणार आहे. नेहमीच आपल्या हटके अंदाजामुळे, किंवा वेगळ्या फॅशनमुळे चर्चेत असणारा रणवीर आता ब्रँड व्हॅल्यूतील नंबर १ पोझिशनमुळे टॉपवर आहे. 

Web Title: Bollywood's 'Ranveer singh' actor earns huge; No. 1 overtaking Virat Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.