बॉलिवूडला लागले कोरोनाचे ग्रहण, फातिमा सना शेख कोरोनामुळे झाली बेहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 03:07 PM2021-04-02T15:07:13+5:302021-04-02T15:08:03+5:30

फातिमा सना शेखने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने आपल्या तब्येतीबद्दल सांगितले आहे.

Bollywood's eclipse of corona, Fatima Sana Shaikh Has Lost Smell And Taste During Coronavirus | बॉलिवूडला लागले कोरोनाचे ग्रहण, फातिमा सना शेख कोरोनामुळे झाली बेहाल

बॉलिवूडला लागले कोरोनाचे ग्रहण, फातिमा सना शेख कोरोनामुळे झाली बेहाल

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यात रणबीर कपूर, आर. माधवन, मनोज वाजपेयी, आमिर खान, आलिया भटपासून दंगल फेम फातिमा सना शेख या कलाकारांचा समावेश आहे. फातिमा सना शेखने मागील काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले होते आणि आता तिने कोरोनामुळे तिचे हाल होत असल्याचाही खुलासा केला आहे. फातिमा सना शेखने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने आपल्या तब्येतीबद्दल सांगितले आहे.

फातिमा सना शेखने इंस्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती खूप आजारी दिसते आहे. या फोटोत ती उदास दिसते आहे. तिने स्वतःचा सेल्फी क्लिक केला आहे. फोटो शेअर करत तिने लिहिले की, कोरोनामुळे तिला अडचणींचा सामना करावा लागतो आहे. फातिमाने म्हटले की, वास घेण्याची आणि चवीची क्षमता संपली आहे आणि शरीर खूप दुखते आहे. तिच्या या पोस्टवरून लक्षात येते की सध्या ती वाईट टप्प्यातून जात आहे.


नुकतेच फातिमाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर तिने कोविड नियमांचे पालन करत स्वतःला घरात क्वारंटाइन केले होते. फातिमाने २९ मार्चला एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिने कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. यासोबतच तिने होम क्वारंटाइन होत असून कोरोनाच्या नियमांचे पालन करत असल्याचे सांगितले होते.


फातिमाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर फातिमा सना शेख अभिनेता अनिल कपूरसोबत एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होती. नुकतीच ती लूडो सिनेमात दिसली होती. यात तिच्यासोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत होता. तसेच तिचा सूरज पे मंगल भारी हा चित्रपटही रिलीज झाला होता. यात तिच्यासोबत मनोज वाजपेयी आणि दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत होता.

Web Title: Bollywood's eclipse of corona, Fatima Sana Shaikh Has Lost Smell And Taste During Coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.