-रवींद्र मोरे
शाहिद कपूरचा ‘कबीर सिंह’ नुकताच रिलीज झाला असून यात कियारा आडवाणीदेखील मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना आवडत असून शाहिदची भूमिकादेखील आकर्षित करत आहे. शाहिदने या चित्रपटात प्रेमात आकंठ बुडालेल्या एका आशिकची भूमिका साकारली आहे. या अगोदरही बॉलिवूडमध्ये असे बरेच चित्रपट बनलेले आहेत ज्यात अ‍ॅक्टर्सने आशिकची भूमिका साकारुन प्रेक्षकांना इंप्रेस केले आहे. आज आपण अशाच काही चित्रपटांबाबत जाणून घेऊया...

* डर


या यादीत सर्वात पहिले नाव येते ते शाहरुख खानच्या ‘डर’ चित्रपटाचे. यात किंग खानने एक अशा प्रेमात बुडालेल्या आशिकची भूमिका साकारली होती ज्याची लोकांनाही भीती वाटू लागली होती. या चित्रपटात जूही चावलावरील शाहरुखचे अति प्रेम दाखविण्यात आले होते. डर मध्ये शाहरुख खानच्या भूमिकेचे नाव राहुल मेहरा होते तर जूहीने किरणची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील डायलॉग 'क..क..किरण..' आजही लोकं बोलताना दिसतात.

* अंजाम


‘डर’ चित्रपटानंतर किंग खानचा अजून एक चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाचे नाव ‘अंजाम’ होते. अंजाममध्ये शाहरुखने ‘डर’ सारख्याच एका सनकी आशिकची भूमिका साकारली होती. यात त्याचे नाव विजय तर माधुरी दीक्षितचे नाव शिवानी चोपडा होते. विजयचे वेडं पे्रम शिवानीची काय गंभीर अवस्था करते हे या चित्रपटात दाखविले आहे.

* तेरे नाम
चित्रपटात प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमीची भूमिका साकारण्यात सलमान खानदेखील मागे नाही राहिला. ‘तेरे नाम’ चित्रपटातील राधेची भूमिका आजही प्रेक्षक विसरले नाहीत. या चित्रपटात राधे (सलमान खान), नीरजरा (भूमिका चावला) वर खूपच प्रेम करतो. तो तिच्या प्रेमात शेवटी मेंटली डिस्टर्ब कसा होतो हे या चित्रपटात दाखविले आहे. यात सलमान खानचे जेलमधील असे काही सीन आहेत ज्याने प्रेक्ष कांना रडू आल्याशिवाय राहत नाही.

* रॉकस्टार
रणबीर कपूरने देखील अशा आशिकची भूमिका साकारली आहे. रणबीरचा २०११ मध्ये ‘रॉकस्टार’ रिलीज झाला होता. या चित्रपटात रणबीरने जॉर्डनची भूमिका साकारली होती. जॉर्डन एक खूप मोठा स्टार्स बनतो मात्र जेव्हा त्याला त्याचे प्रेम मिळत नाही तर तो कशाप्रकारे वाया जातो हे या चित्रपटात दाखविले आहे. यात रणबीरच्या अपोजिट नर्गिस फाकरी मुख्य भूमिकेत होती.

* रांझणा


हा चित्रपट २०१३ मध्ये रिलीज झाला होता. यात धनुष सोनम कपूरच्या अपोजिट होता. चित्रपटात धनुषने आशिकची भूमिका साकारली होती, जो सोनम कपूरचे मन जिंकण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करतो. रांझणामध्ये धनुषने कुंदन शंकरची तर सोनम कपूरने जोयाची भूमिका साकारली होती. कुंदन शेवटी प्रेमात आपला जीवदेखील देतो हे या चित्रपटात दाखविले आहे.


Web Title: bollywood-films-in-which-actor-become-mad-lover
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.