ठळक मुद्देकाही वर्षांपूर्वी रिया सेनचा सहकलाकार अश्मित पटेल आणि तिचा एक एमएमएस लीक झाला होता. या एमएसची बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा झाली होती.

रिया सेनचा आज म्हणजेच 24 जानेवारीला वाढदिवस असून ती मुनमुन सेन या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी तर सुचित्रा सेन या ज्येष्ठ अभिनेत्रींची नात आहे. आपल्या आई आणि आजीच्या पावलावर पाऊल ठेवत तिने बालकलाकार म्हणूनच तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने अपना सपना मनी मनी, सिलसिले, स्टाईल यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. पण तिला बॉलिवूडमध्ये म्हणावी तशी लोकप्रियता मिळाली नाही. 

रिया सेन नेहमीच तिच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली. रिया कधी एमएमएसमुळे तर कधी तिच्या प्रेमप्रकरणांमुळे चर्चेत आली. रिया सेन आणि वाद यांचे खूपच जवळचे नाते आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. 

काही वर्षांपूर्वी रिया सेनचा सहकलाकार अश्मित पटेल आणि तिचा एक एमएमएस लीक झाला होता. या एमएसची बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा झाली होती. हा एमएमएस सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

2005 मध्ये रिया सेन अश्मित वासू भगनानीसोबत सिलसिले या चित्रपटात काम करत होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान त्या दोघांच्या अफेअरला सुरुवात झाली असल्याची चर्चा त्याकाळात चांगलीच रंगली होती. एवढेच नव्हे तर रागिणी एमएमएस रिटर्न या चित्रपटाच्यावेळी अभिनेता निशांत मकलानीने चित्रीकरणाच्यादरम्यान रियाने इंटिमेट सीन चित्रीत करताना त्याचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप तिच्यावर केला होता. 

2016 मध्ये एका पार्टीत रिया वाईल्ड अंदाजात दिसली होती. तिने चक्क एका मुलीला किस केले होते. तसेच या पार्टीत अनेक जणांसोबत तिने अश्लील फोटो काढले असल्याचे म्हटले जाते. तसेच क्रिकेटर श्रीसंतसोबत देखील एकेकाळी तिचे नाव जोडले गेले होते. त्या दोघांना अनेक पार्टींमध्ये एकत्र पाहाण्यात आले होते. 

रियाने 2017 मध्ये शिवम तिवारी या फोटोग्राफरसोबत लग्न करत बॉलिवूडला रामराम ठोकला. ती चित्रपटात काम करत नसली तरी ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. 

Web Title: Bollywood Actress Riya sen controversial life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.