करिश्मा- करीनाप्रमाणेच Malaika Aroraचं देखील आहे निक नेम; घरी 'या' नावाने मारतात हाक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 11:51 AM2021-10-17T11:51:29+5:302021-10-17T11:52:23+5:30

Malaika arora: सध्या मलायका इंडियाज बेस्ट डान्सर 2' या कार्यक्रमात परिक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. याच शोच्या मंचावर तिने तिच्या निक नेमचा खुलासा केला आहे. 

bollywood actress malaika arora shared her nick name | करिश्मा- करीनाप्रमाणेच Malaika Aroraचं देखील आहे निक नेम; घरी 'या' नावाने मारतात हाक

करिश्मा- करीनाप्रमाणेच Malaika Aroraचं देखील आहे निक नेम; घरी 'या' नावाने मारतात हाक

googlenewsNext
ठळक मुद्दे मलायका अरबाजपासून विभक्त झाल्यानंतर अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत असल्याचं पाहायला मिळतं.

फिटनेसच्या जोरावर २० वर्षाच्या तरुणीलाही लाजेवल अशी अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा (Malaika Arora). फिटनेसच्या बाबतीत कायम सजग असणारी मलायका सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. अनेकदा नेटकऱ्यांमध्ये तिच्या ग्लॅमरस लूक, लक्झरी लाइफस्टाइलची चर्चा होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या चालण्याच्या विचित्र पद्धतीमुळे ट्रोल होत आहे. विशेष म्हणजे बऱ्याचदा ट्रोलिंगचा सामना करणारी मलायका सध्या तिच्या निक नेममुळे म्हणजेच टोपणनावामुळे चर्चेत आली आहे.

सध्या मलायका इंडियाज बेस्ट डान्सर 2' (India's Best Dancer 2) या कार्यक्रमात परिक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. याच शोच्या मंचावर तिने तिच्या निक नेमचा खुलासा केला आहे. 

अलिकडेच या शोमध्ये मेयितेम्सु नागा(Mayitemsu Naga) या स्पर्धकाने ऑडिशन राऊंडमध्ये हजेरी लावली होती. यावेळी मेयितेम्सु याने इश्क वाला लव या गाण्यावर परफॉर्मन्स सादर केला. विशेष म्हणजे मेयितेम्सु याच्या नावाचा उच्चार करणं परिक्षकांना कठीण जात असल्यामुळे मेयितेम्सुने त्याचं निक नेम या मंचावर सांगितलं.

"मला हिंदी बोलता येत नाही. मला फक्त इंग्लिश आणि माझ्या मातृभाषेत अंगमीमध्येच बोलता येतं. तसंच जर माझ्या नावाचा उच्चार जमत नसेल तर मला 'मिमी' या टोपणनावाने हाक मारली तरी चालेल", असं मेयितेम्सुने सांगितलं. मेयितेम्सुने त्याचं टोपणनाव सांगितल्यानंतर मलायकानेदेखील तिचं निक नेमचा खुलासा केला. 

"माझं टोपणनावदेखील हेच आहे.  मला घरी सगळे 'मिमी' याच नावाने हाक मारतात", असं मलायका म्हणाली. 

दरम्यान, मलायका बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असून अनेक चित्रपटांमध्ये आयटम साँग्स केल्यामुळे ती चर्चेत आली आहे. आतापर्यंत तिची अनेक गाणी गाजली आहेत. सोबतच ती तिच्या फिटनेससाठी विशेष चर्चिली जाते. एकेकाळी खान कुटुंबाची सून असलेली मलायका अरबाजपासून विभक्त झाल्यानंतर अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत असल्याचं पाहायला मिळतं.
 

Web Title: bollywood actress malaika arora shared her nick name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.