Bollywood actress has finally completed her home in Mumbai! | बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीचे अखेर मुंबईत झाले हक्काचे घर!
बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीचे अखेर मुंबईत झाले हक्काचे घर!

मुंबईत आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. मग त्यातून सेलिब्रिटीही सुटत नाहीत. हे स्वप्न साकार करण्यासाठी मेहनत करणाऱ्यांची कमतरताही या शहरात नाही. धकाधकीच्या या आयुष्यात स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या  अशाच एका अभिनेत्रीला या शहरात स्वत:चं असं घर सापडलं आहे. ती अभिनेत्री आहे, तापसी पन्नू. 

सुत्रांनुसार, तापसीने मुंबईत ३ बीएचकेचा आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. या फ्लॅटमध्ये तापसीची बहीण इंटेरिअर डिझायनिंगचं काम करणार आहे. त्यामुळे तापसीसाठी तिचं हे नवं घर अगदी खास ठरत आहे. 

तापसी सध्याच्या घडीला मुंबईच्या उपनगरीय भागात राहते. ज्यानंतर तिला जेव्हा या नव्या घराच्या विक्रीविषयी माहिती मिळाली तेव्हा तिने लगेचच ते खरेदी करण्यासाठीची उचल केली. तापसीने खरेदी केलेल्या या घरात तिची बहिण इंटेरिअर करणार आहे. काही दिवसांपूर्वीच तापसी थायलंडला गेली होती ज्या ठिकाणहून तिने काही शोभेच्या वस्तूही आणल्या होत्या. ज्यांच्या माध्यामातून ती तिचं हे नवं घर सुशोभित करणार आहे. 

तापसीने तिच्या या नव्या घराविषयी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. दरम्यान, नव्या घराच्या आनंदात असणारी तापसी येत्या काळात गेम ओव्हर या चित्रपटातून झळकणार आहे. या विविधभाषी थरारपटातून ती पुन्हा एकदा प्रभावी भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  
 


Web Title:  Bollywood actress has finally completed her home in Mumbai!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.