Sohail Khan Seema Khan Divorce : सोहेल खान व सीमा खान यांच्यात नेमकं काय बिनसलं? काय आहे घटस्फोटाचं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 04:32 PM2022-05-13T16:32:31+5:302022-05-13T16:39:15+5:30

Sohail Khan Seema Khan Divorce : काही वर्षांपूर्वीच सलमानचा भाऊ अरबाज खान व त्याची पत्नी मलायका अरोरा यांचा घटस्फोट झाला. आता सोहेल व सीमा यांचाही घटस्फोट म्हटल्यावर खान कुटुंबासाठी हा मोठा धक्का आहे.

bollywood actor Sohail Khan Seema Khan file for divorce what a reason in marathi | Sohail Khan Seema Khan Divorce : सोहेल खान व सीमा खान यांच्यात नेमकं काय बिनसलं? काय आहे घटस्फोटाचं कारण?

Sohail Khan Seema Khan Divorce : सोहेल खान व सीमा खान यांच्यात नेमकं काय बिनसलं? काय आहे घटस्फोटाचं कारण?

Next

Sohail Khan Seema Khan Divorce :बॉलिवूडमध्ये अलीकडच्या काळात अनेकांचे संसार मोडले. अनेक सेलिब्रिटी कपल्सनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. आता या यादीत सलमान खानचा भाऊ सोहेल खान (Sohail Khan)आणि त्याची पत्नी सीमा सचदेव (Seema Sachdev) यांचं नावंही सामील झालं आहे. लग्नाच्या 24 वर्षांनंतर सोहेल व सीमा यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. आज दोघंही फॅमिली कोर्टाबाहेर दिसले.  दोघांनीही फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचं कळतंय. अर्थात अद्याप सोहेल वा सीमा यांच्यापैकी कुणीही अधिकृतपणे घटस्फोटाची घोषणा केलेली नाही.

काही वर्षांपूर्वीच सलमानचा भाऊ अरबाज खान व त्याची पत्नी मलायका अरोरा यांचा घटस्फोट झाला. आता सोहेल व सीमा यांचाही घटस्फोट म्हटल्यावर खान कुटुंबासाठी हा मोठा धक्का आहे. चर्चा खरी मानाल तर सलमान खानने (Salman Khan) सीमा व सोहेलचं नातं वाचवण्याचे बरेच प्रयत्न केले. मात्र ते अपयशी ठरले.
सीमा व सोहेल अनेक वर्षांपासून वेगवेगळे राहतात. एका शोमध्ये खुद्द सीमाने हा खुलासा केला होता. अर्थात आम्ही एक कुटुंब आहोत आणि सोहेल एक चांगला पिता आहे, असं ती म्हणाली होती.

का होतोय घटस्फोट?
सोहेल व सीमा यांच्या नात्यात असं काय बिनसलं की ते घटस्फोट घेत आहेत, याचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण रिपोर्टनुसार, काही वर्षांआधी दोघांच्या संसारात कुरबुर सुरु झाली होती. काही वर्षांआधी सोहेलचं नाव अभिनेत्री हुमा कुरेशीसोबत जोडलं गेलं होतं. असं म्हणतात की, त्यावेळी सीमा घर सोडून गेली होती. तेव्हापासूनच दोघांमध्ये मतभेद निर्माण झालेत. हुमा कुरेशी व सोहेलची भेट सेलिब्रिटी क्रिकेट लीगदरम्यान झाली होती. हुमाला सोहेलने त्याच्या टीमची ब्रँड अ‍ॅम्बिसीडर बनवलं होतं. यानंतर बघता बघता सोहेल व हुमाच्या अफेअरच्या चर्चा व्हायला लागल्या होत्या. अर्थात हुमा व सोहेल दोघांनीही या सगळ्या अफवा असल्याचं स्पष्ट केलं होतं.

Web Title: bollywood actor Sohail Khan Seema Khan file for divorce what a reason in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app