Aarey Forest Protest : आरे कारशेडला बॉलिवूड कलाकारांचाही विरोध!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 02:24 PM2019-10-05T14:24:30+5:302019-10-05T14:27:08+5:30

आरेतील कारशेड उभारणीसाठी कराव्या लागणाऱ्या वृक्षतोडीला पर्यावरणवादी आणि स्थानिकांनी विरोध दर्शवला. आरेला वाचवण्यासाठी सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरली. शिवाय बॉलिवूडच्या काही कलाकारांनीही या घटनेला विरोध दर्शवत ट्वीटद्वारे आपला रोष व्यक्त केला आहे.

bollywood-actor-express-their-anger-against-aarey-forest | Aarey Forest Protest : आरे कारशेडला बॉलिवूड कलाकारांचाही विरोध!

Aarey Forest Protest : आरे कारशेडला बॉलिवूड कलाकारांचाही विरोध!

googlenewsNext

-रवींद्र मोरे 
आरेमध्ये मेट्रोचं कारशेड उभारण्यासाठी जवळपास अडीच हजार झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. याविरोधात अनेक पर्यावरणवाद्यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. मात्र या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावल्या. आरेतील कारशेड उभारणीसाठी कराव्या लागणाऱ्या वृक्षतोडीला पर्यावरणवादी आणि स्थानिकांनी विरोध दर्शवला. आरेला वाचवण्यासाठी सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरली. शिवाय बॉलिवूडच्या काही कलाकारांनीही या घटनेला विरोध दर्शवत ट्वीटद्वारे आपला रोष व्यक्त केला आहे.

* स्वरा भास्कर


अभिनेत्री स्वरा भास्करनेही या घटनेला विरोध केला आहे. प्रत्येक प्रकरणात आवाज उठविणारी स्वराने ट्वीट केले आहे की, ‘आणि हे सुरु झाले..! आरे जंगल नष्ट होत आहे.’ चित्रपट निर्माता ओनिरनेही लिहिले आहे की, ‘अंधाºयात आमच्या झाडांवर कुºहाड पडत आहे. रेस्ट इन पिस फॉरेस्ट. आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नाहीत. अनेक वृक्षांची कत्तल झाल्याने मनाला खूपच दु:ख होत आहे आणि यास मानवी लोभ कारणीभूत आहे.

* दिया मिर्झा


बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने देखील या घटनेचा तिव्र विरोध करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. दिया मिर्झा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, काय हे अवैध नाहीय? आरे मध्ये हे काय घडत आहे? दियाने आपल्या ट्वीटमध्ये बीएमसी, विशाल ददलानी, आदित्य ठाकरे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.

* फरहान अख्तर


फरहानने ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला आहे की, रात्रीच्या वेळी वृक्षांना तोडणे एक दयनीय प्रयत्न आहे. जे कोणी असे करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनाही माहित आहे की, हे चुकीचे आहे. फरहानने यासोबतच आरे, गिनल्स गोल्ड, मुंबई असे हॅशटॅग्सचा वापर केला आहे.

* श्रद्धा कपूर


आशिकी 2 फेम अभिनेत्री श्रद्धा कपूरनेही या आंदोलनात मोठा सहभाग घेतला आहे. श्रद्धाने रस्त्यावर उतरुन या घटनेच्या विरोधात प्रदर्शनदेखील केले आहे. याशिवाय ट्वीटरवरही आरे परिसरातील वृक्षतोडीवर तिने नाराजी व्यक्त केली आहे. श्रद्धाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकत म्हटली आहे की, मेट्रोसाठी आरे कॉलनीमध्ये सुमारे २,७०० वृक्षांची कत्तर केली जाणार आहे.

Web Title: bollywood-actor-express-their-anger-against-aarey-forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.