बॉलिवूड अभिनेता आसिफ बसरा याची आत्महत्या, कुत्र्याच्या पट्ट्याने लावला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 04:18 PM2020-11-12T16:18:06+5:302020-11-12T16:30:49+5:30

शॉकिंग, बॉलिवूडला आणखी एक धक्का

bollywood actor asif basra committed suicide in dharamshala | बॉलिवूड अभिनेता आसिफ बसरा याची आत्महत्या, कुत्र्याच्या पट्ट्याने लावला गळफास

बॉलिवूड अभिनेता आसिफ बसरा याची आत्महत्या, कुत्र्याच्या पट्ट्याने लावला गळफास

googlenewsNext
ठळक मुद्देआसिफ बसरा टीव्हीचा एक लोकप्रिय चेहरा होता. बॉलिवूडच्या अनेक सिनेमात त्याने काम केले आहे.

बॉलिवूड हरहुन्नरी अभिनेता आणि रंगभूमी कलाकार आसिफ बसरा याने गुरूवारी हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यातील धर्मशाळा येथे गळफास लावून आत्महत्या केली. जोगिबाडा रोडवरील एका कॅफेमध्ये त्याने गळफास घेतला. त्याच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. कांगडाचे एसपी विमुक्त रंजन यांनी या  घटनेला दुजोरा दिला आहे. वयाच्या 53 व्या वर्षी अशाप्रकारे टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण बॉलिवूड हादरले आहे.


कुत्र्याच्या पट्ट्याने घेतला गळफास
गुरूवारी दुपारी आसिफ बसरा आपल्या पाळीव कुत्र्याला घेऊन फिरायला गेला होता. घरी आल्यानंतर आपल्या या कुत्र्याच्या पट्ट्याने त्याने गळफास घेतला. आसिफ हा गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता, असे कळते.

लिव्ह-इनमध्ये राहत असल्याची चर्चा

रिपोर्टनुसार, आसिफ बसरा गेल्या 5 वर्षांपासून मक्लोडगंजच्या एका भाड्याच्या घरात राहत होता. त्याच्यासोबत एक विदेशी महिला सुद्धा राहत होती. या महिलेसोबत आसिफ लिव्ह-इनमध्ये राहत असल्याची चर्चा आहे.

कोण आहे आसिफ बसरा
आसिफ बसरा टीव्हीचा एक लोकप्रिय चेहरा होता. बॉलिवूडच्या अनेक सिनेमात त्याने काम केले आहे. परजानियां, ब्लॅक फ्राईडे या सिनेमात त्याने काम केले होते. हॉलिवूड सिनेमा ‘आऊटसोर्स’मध्येही तो दिसला होता. हिमाचली सिनेमा सांझमधील त्यांचा अभिनय विशेष गाजला होता. इमरान हाश्मीच्या ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ या सिनेमात त्याने इमरानच्या वडिलांची भूमिका साकारली होती.

Read in English

Web Title: bollywood actor asif basra committed suicide in dharamshala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.