बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालने काही दिवसांपूर्वीच त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएडस ही प्रेग्नेंट असल्याचे जाहीर केले होते. त्याने गॅब्रिएलासोबतचा फोटो शेअर करुन तिच्या प्रेग्नेंसीबद्दल सांगितले होते. सध्या हे दोघेही मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. त्यांनी याचे काही फोटोही इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

अर्जुन रामपाल व गॅब्रिएला यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत ते दोघेही समुद्री किनारी असल्याचे पहायला मिळत आहेत. याच ठिकाणी अर्जुनने तिच्यासोबत सेल्फीदेखील काढला आहे. यावेळी अर्जुन हा शर्टलेस आहे. तर गॅब्रिएला ही व्हाइट आऊटफिटमध्ये पाहायला मिळते आहे.

अर्जुनशिवाय गॅब्रिएलाने देखील मालदिवमधील हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याशिवाय दुसऱ्या फोटोमध्ये दोघेही सेल्फीसाठी खास पोझ देत आहेत. या फोटोमध्ये अर्जुन हा ग्रे शर्टमध्ये पाहायला मिळतो आहे. तर गॅब्रिएला ही व्हाइट फुल स्लीव्ज आऊटफिटमध्ये दिसते आहे. तिने यावेळी गळ्यात गोल्डन क्रॉस पेंडेंड असलेली चेन घातली आहे. 


या फोटोंव्यतिरिक्त गॅब्रिएला ही दुसऱ्या फोटोमध्ये पाण्यात एकटीच दिसते आहे. या फोटोत ती ब्लॅक बिकनीमध्ये स्विमिंग करताना दिसत आहे.

अर्जुनला पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत. त्यांची नावं माहिका आणि मायरा आहेत. मेहर जेसिका आणि अर्जुनने एकमेकांसोबत 20 वर्ष संसार केला.    


गेल्या काही महिन्यांपासून अर्जुन त्याची गर्लफ्रेंड गॅबरिलासोबत बिनधास्तपणे मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसत होता.दोघे पाली हिलच्या एका अपार्टमेंटमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत आहेत.

पत्नी मेहर जेसिकासोबत घटस्फोट झाल्यानंतर अर्जुन  मॉडेल गॅबरिलात गुंतला. हळूहळू दोघेही एकमेकांच्या जवळ आलेत. यानंतर अनेक इव्हेंटला दोघेही एकत्र दिसू लागलेत. 


गॅबरिला एक आफ्रिकी मॉडेल आहे. ‘सोनाली केबल’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता.

पण बॉक्सऑफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही.  


Web Title: bollywood-actor-arjun-rampal-vacation-pregnant-maldives-girlfriend-gabriella-demetriades-photo
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.