ठळक मुद्देसनीने मे २००७ मध्ये सहा अ‍ॅडल्ट सिनेमे साईन केले होते. पण यासाठी तिने एक अट ठेवली होती.

अ‍ॅडल्ट स्टार ते बॉलिवूड स्टार असा प्रवास करणारी अभिनेत्री सनी लिओनी हिचा आज (१३ मे) वाढदिवस. १३ मे १९८१ रोजी जन्मलेल्या सनीचे खरे नाव करणजीत कौर वोहरा आहे. इंटरनेटवर ‘मोस्ट सर्च्ड पीपल’च्या यादीत स्थान मिळवणारी सनी सुमारे ८२.२० कोटींच्या संपत्तीची मालकीन आहे. तिच्याकडे अनेक महागड्या अलिशान गाड्या आहेत. एका चित्रपटासाठी सनी ४.५ कोटी रूपये घेते, असे कळते. खरे तर सनी लिओनीच्या कामाबद्दल सगळेच जाणतात. पण तिच्या स्ट्रगलबद्दल मात्र फार कमी लोकांना माहिती आहे.तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण आपल्या स्ट्रगलिंग काळात सनीने एका जर्मन बेकरीत काम केले. पैशांसाठी दिर्घकाळ तिने या बेकरीत स्वत:ला वाहून घेतले होते. याशिवाय तिने एका टॅक्स फर्ममध्येही पार्टटाईम जॉब घेतला होता. बेकरीत काम करत असताना सनी पॉर्न इंडस्ट्रीकडे कशी वळली, याचीही एक कथा आहे.

होय, सनीची एक मैत्रिण होती. ती डान्सर होती. तिनेच लोकप्रिय अ‍ॅडल्ट मॅगझिन ‘पेंट हॉऊस’च्या एका फोटोग्राफरशी सनीची भेट घालून दिली. ही भेट झाली आणि सनीने पॉर्न इंडस्ट्रीत आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला. याच करिअरसाठी ती करणजीतची सनी लिओनी बनली.सनी पॉर्न इंडस्ट्रीत काम करायची. पण यासाठी तिच्या काही अटी होत्या. सनीने मे २००७ मध्ये सहा अ‍ॅडल्ट सिनेमे साईन केले होते. पण यासाठी तिने एक अट ठेवली होती. तिच्या सर्वच पॉर्न सिनेमांमध्ये तिचा बॉयफ्रेन्ड मेट एरिक्सन तिच्यासोबत होता. त्यावेळी केवळ मेटसोबत म्हणजेच तिच्या तेव्हाच्या होणाऱ्या पतीसोबत तिने अ‍ॅडल्ट सिनेमात काम केले होते. त्याव्यतिरिक्त तिने समलैंगिक सिनेमांमध्ये काम केले.मेट एरिक्सन हा प्लेबॉय एंटरप्राइजचा व्हाईस प्रेसीडेट आॅफ मार्केटिंग होता. २००८ मध्ये त्याचे आणि सनीचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतर सनीने मेटसोबत काम करण्यास नकार दिला. यामुळे मेट चांगलाच नाराज झाला होता. इतका की, संतापून त्याने सनीचे आणि त्याचे काही प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल केले होते.


या ब्रेकअपनंतर सनी प्रसिद्ध कॉमेडियन रसेल पीटर्सला डेट करत होती. पण हे नातेही फार काळ टिकले नाही. नंतर सनीने २०११ मध्ये ३ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर डॅनिअल वेबरसोबत लग्न केले. सनीने डॅनिअल वेबरसोबतही काही पॉर्न सिनेमांमध्ये काम केले आहे.


Web Title: Birthday Special: sunny leone struggle adult star to bollywood actress
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.