करिश्मा कपूरनं सासरी खूप काही सोसलं आणि अखेर पतीला सोडलं, ‘हा’ एक किस्सा वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 08:00 AM2021-06-25T08:00:00+5:302021-06-25T08:00:02+5:30

शोमॅन राजू कपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर आणि बबीता यांची कन्या करिश्मा कपूर हिचा आज (25 जून) वाढदिवस.

birthday special Sunjay Kapur asked mother to slap Karisma kapoor | करिश्मा कपूरनं सासरी खूप काही सोसलं आणि अखेर पतीला सोडलं, ‘हा’ एक किस्सा वाचून बसेल धक्का

करिश्मा कपूरनं सासरी खूप काही सोसलं आणि अखेर पतीला सोडलं, ‘हा’ एक किस्सा वाचून बसेल धक्का

googlenewsNext
ठळक मुद्देपोटगीपोटी संजयने करिश्माला 10 कोटी रुपये आणि राहण्यासाठी एक बंगला दिला होता. सध्या संजय त्याच्या दोन्ही मुलांचा शिक्षणाचा खर्च सुद्धा करत आहे.

शोमॅन राजू कपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर आणि बबीता यांची कन्या करिश्मा कपूर (Karisma Kapoor) हिचा आज (25 जून) वाढदिवस. 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवणा-या करिश्माने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला. पण दुर्दैवाने करिश्माचा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला. त्यानंतर एकामागून एक करिश्माचे तब्बल 12 चित्रपट फ्लॉपच्या यादीत जमा झाला होते. या अपयशामुळे करिश्मा खचून गेली होती. इतकी की, ती रात्ररात्र नुसती रडायची.  पदार्पणाच्या चार वर्षांनंतर करिश्माला यशाची चव चाखायला मिळाली. (Karisma Kapoor birthday)

1994 मध्ये आलेल्या ‘राजा बाबू’  या चित्रपटाने करिश्माला स्टार बनवले. पण आज ही स्टार बॉलिवूडमधून गायब आहे. 2012 मध्ये आलेल्या ‘डेंजरस इश्क’ यात ती अखेरची झळकली होती. 2002 मध्ये करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चनचा साखरपुडा झाला होता. पण हा साखरपुडा तुटला. पुढे 2003 मध्ये करिश्माने बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केले.  2016 मध्ये करिश्माने पती संजय कपूरपासून घटस्फोट घेतला.

अभिनेत्री करिश्मा कपूर आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती संजय कपूर यांच्या नात्याची अखेर खूप वादग्रस्त राहिली.  बातम्यांच्या रूपात हा वाद चव्हाट्यावर आला होता. करिश्माने संजयवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. घटस्फोटासाठी दाखल अर्जात तिने अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला होता. एक किस्सा तर इतका धक्कादायक होता की, तो ऐकून प्रत्येकाला धक्का बसला होता. गरोदर असताना संजयने त्याच्या आईला करिश्माच्या थोबाडीत मारण्यास सांगितले होते. (Sunjay Kapur asked mother to slap Karisma kapoor)

करिश्मा त्यावेळी प्रेग्नंट होती. प्रेग्नंसीदरम्यान तिचे वजन बरेच वाढले होते. प्रसूतीनंतर संजयने करिश्माला एक ड्रेस घालायला सांगितला. पण जाड झाल्यामुळे तो ड्रेस करिश्माला फिट झाला नाही. हे पाहून संजय करिश्मावर प्रचंड संतापला होता. इतका की, हिला (करिश्माला)एक थोबाडीत मार, असे तो आपल्या आईला म्हणाला होता.

करिश्माने संजयवर असे अनेक आरोप केले होते. आजारी मुलाला सोडून तो पोलो खेळायला गेल्याचा आरोपही तिने केला होता. संजय त्याच्या भावाला करिश्मावर नजर ठेवायला सांगायचा. लहान-सहान गोष्टींवरून हायपर व्हायचा आणि मारायचा. सासू सुद्धा तिला मारायची, असे आरोपही करिश्माने केले होते. 

हा सगळा त्रास व छळ असह्य झाल्याने अखेर करिश्माने संजयला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर करिश्मा आई बबिता कडे येऊन राहू लागली. 201 6 साली दोघांनी घटस्फोट घेतला होता.  पोटगीपोटी संजयने करिश्माला 10 कोटी रुपये आणि राहण्यासाठी एक बंगला दिला होता. सध्या संजय त्याच्या दोन्ही मुलांचा शिक्षणाचा खर्च सुद्धा करत आहे.

 

Web Title: birthday special Sunjay Kapur asked mother to slap Karisma kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.