ठळक मुद्देखरे तर खान कुटुंबातील सगळे सदस्य बॉलिवूडमध्ये आहेत. पण सबाने चित्रपटांपासून दूर राहणे पसंत केले.

सैफ अली खानची बहीण सोहा अली खान बॉलिवूडची अभिनेत्री आहे. सोहाबद्दल सगळेच जाणतात. पण सोहाला आणखी एक बहीण आहे, काय हे तुम्हाला ठाऊक आहे? होय, सोहाला एक मोठी बहीण आहे. सैफपेक्षा लहान आणि सोहापेक्षा मोठी अशा या खान कुटुंबातील सदस्याचे नाव आहे, सबा अली खान. होय, सबा बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेपासून दूर राहणे पसंत करते. पेज 3 पार्ट्यांनाही ती दिसत नाही. कौटुंबिक कार्यक्रम सोडले तर ती फार कमी दिसते. आज सोहाचा वाढदिवसानिमित्त तिच्या मोठ्या बहीणीबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
होय, सोहाची मोठी बहीण आणि करिना कपूरची मोठी नणंद सबा ही लाईमलाईटपासून दूर असली तरी कोट्यवधी रूपयांची मालकीण आहे. होय, तिची एकटीची संपत्ती जवळजवळ 2700 कोटींच्या घरात आहे. 

सबा भोपाळच्या औकाफ-ए-शाहीची प्रमुख आहे. भारत सरकार आणि भोपाळ संस्थानचे तत्कालीन नवाब हमीदुल्ला खां यांच्यात झालेल्या करारानुसार, औकाफ-ए-शाहीवर वक्फ बोर्डचा हक्क राहणार नसल्याचे ठरले होते. नवाब घराण्याची ही एक स्वतंत्र संस्था आहे. सरकारच्या करारानुसार, औकाफ-ए-शाहीचा प्रमुख हा भोपाळच्या नवाब किंवा पतौडी घराण्यातूनच असेल.  

सबाने चाळीशी ओलांडलीय. पण अद्यापही ती अविवाहित आहे.

ती ज्वेलरी डिझाईनर आहे. काही वर्षांपूर्वी तिने एक डायमंड चेन सुरु केली होती.

सबाचे तिच्या वहीणीसोबत म्हणजेच करिनासोबत खास बॉन्डिंग आहे. करिनासाठी तिने अनेकदा ज्वेलरी डिझाईन केली आहे.

खरे तर खान कुटुंबातील सगळे सदस्य बॉलिवूडमध्ये आहेत. पण सबाने चित्रपटांपासून दूर राहणे पसंत केले. याचे कारण म्हणजे, तिचा लाजाळू स्वभाव. ती स्वभावाने अतिशय लाजाळू आहे.

एका मुलाखतीत सबा यावर बोलली होती. माझ्या मनात कधीच फिल्म इंडस्ट्रीत जाण्याचा विचार आला नाही. मी जिथे आहे, जे काम करतेय, त्यात मी आनंदी आहे, असे ती म्हणाली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Birthday Special : Soha Ali Khan has an older sister, have diamond business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.