ठळक मुद्देसंपूर्ण देशमुख घराणे राजकारणात सक्रिय असल्याने रितेश सुद्धा राजकारणात जाईल, असाच अनेकांचा अंदाज होता. पण रितेशने हा अंदाज खोटा ठरवत, अभिनयाची वाट निवडली.

हात भारी.... सगळंच लय भारी, या डायलॉगने अवघ्या महाराष्ट्राला अक्षरश: वेड लावले. हा डायलॉग कोणाचा तर रितेश देशमुख. आज रितेश मराठी सिनेमा आणि बॉलिवूडचा एक लोकप्रिय अभिनेता आहे. रितेशचा कॉमिक टायमिंग जबरदस्त आहे. त्याच्याच शब्दात सांगायचे तर लय भारी. त्याचे सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ तर त्यापेक्षाही भारी आहेत. आज हाच रितेश आपला वाढदिवस साजरा करतोय. तेव्हा त्याचे बेस्ट व्हिडीओ पाहण्याचा मोह कोणाला होणार नाही?

17 डिसेंबर 1978 मध्ये रितेशचा जन्म झाला. संपूर्ण देशमुख घराणे राजकारणात सक्रिय असल्याने रितेश सुद्धा राजकारणात जाईल, असाच अनेकांचा अंदाज होता. पण रितेशने हा अंदाज खोटा ठरवत, अभिनयाची वाट निवडली. 2 फेब्रुवारी 2012 रोजी रितेशने अभिनेत्री जेनेलिया डिसुजासोबत लग्न केले.

या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. कारण जेनेलिया ख्रिश्चन होती तर रितेश हिंदू. रितेश आणि जेनेलियाची लव्हस्टोरी कुठल्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. लग्नासाठी होकार द्यायला जेनेलियाने चक्क 8 वर्षे लावलीत, यावरून या लव्हस्टोरीचा अंदाज यावा.  

‘तुझे मेरी कसम’नंतर ‘मस्ती’ या चित्रपटात जेनेलिया व रितेश यांनी एकत्र काम केले. या सेटवर त्यांचे प्रेम  घट्ट झाले. पण तरीही जेनेलिया लग्नासाठी तयार नव्हती. रितेश आज ना उद्या राजकारणात जाईल, असे तिला वाटत होते. त्यामुळे लग्नासाठी होकार द्यायला तिने तब्बल 8 वर्षे लावली. पण रितेशपासून दूर राहणे तिलाही शक्य नव्हते. अखेर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतलाच. 2012 मध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले. आता या दोघांना दोन मुलं आहेत. 

बाप-लेकाची ही गळाभेट...

वडील विलासराव देशमुख यांच्या 75 व्या जयंतीदिनी रितेशने हा व्हिडीओ शेअर केला होता आणि या व्हिडीओने अनेकांचे डोळे भरून आले होते. विलासरावांचं जॅकेट न्याहाळत असताना त्यातून त्यांचा हात बाहेर येतो आणि रितेशच्या डोक्यावरून मायेनं फिरतो, त्याची पाठ थोपटतो, असा एक क्रिएटिव्ह व्हिडीओ रितेशने सोशल मीडियावर शेअर केला होतो. तो तुफान व्हायरल झाला होता.

आईच्या जुन्या साडीपासून नवे कपडे...

रितेशने यंदाच्या दिवाळीला आईच्या जुन्या साडीपासून त्याच्यासाठी शिवाय आपल्या   दोन्ही मुलांनाही या साडीपासून ड्रेस शिवला होता. या व्हिडीओ रितेशने शेअर केला होता. त्याचा हा व्हिडीओही अनेकांना भावूक करून गेला होता.

ये कामचोर है...

पहिल्या रात्रीबद्दलचा रितेश आणि जेनेनियाचा हा मजेदार व्हिडीओ तुफान व्हायरल झाला.

पाहा, रितेशचे आणखी काही ‘लई भारी’ व्हिडीओ...

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: birthday special riteish deshmukh funny viral videos on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.