‘या’ तिघांसोबत रिलेशनशिपमध्ये होती ही बर्थ डे गर्ल, सध्या पतीसोबत मालदीवमध्ये करतेय सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 08:00 AM2019-08-27T08:00:00+5:302019-08-27T08:00:10+5:30

लग्नाआधी ती प्रेग्नंट होती. लग्नाच्या तीन महिन्यानंतरच आपण लवकरच आई होणार असल्याचे तिने सांगितले होते.

Birthday special neha dhupia boyfriends list from ritwik bhattacharya to angad bedi | ‘या’ तिघांसोबत रिलेशनशिपमध्ये होती ही बर्थ डे गर्ल, सध्या पतीसोबत मालदीवमध्ये करतेय सेलिब्रेशन

‘या’ तिघांसोबत रिलेशनशिपमध्ये होती ही बर्थ डे गर्ल, सध्या पतीसोबत मालदीवमध्ये करतेय सेलिब्रेशन

googlenewsNext
ठळक मुद्देरित्विक एक स्क्वॅश खेळाडू आहे. नेहा व रित्विक एक-दोन नाही तर दहा वर्षे एकमेकांना डेट करत होते.

अभिनेत्री नेहा धूपिया हिचा आज (27 ऑगस्ट ) वाढदिवस. सध्या नेहा पती अंगद बेदीसोबत मालदीवमध्ये वाढदिवस साजरा करतेय. या बर्थ डे सेलिब्रेशनचे अनेक फोटो नेहाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. समुद्र किना-यावर पतीसोबत मौज करताना तिच्या चेह-यावरून आनंद ओसंडून वाहतो आहे.


नेहाने अंगद बेदीसोबत गुपचूप लग्न केले होते. लग्नाआधी ती प्रेग्नंट होती. लग्नाच्या तीन महिन्यानंतरच आपण लवकरच आई होणार असल्याचे तिने सांगितले होते.
अंगद बेदीआधी नेहाने तीन लोकांना डेट केले होते. होय, रित्विक भट्टाचार्य, युवराज सिंग आणि जेम्स सिल्वेस्टरसोबत नेहा रिलेशनशिपमध्ये होती.

रित्विक भट्टाचार्य

रित्विक एक स्क्वॅश खेळाडू आहे. नेहा व रित्विक एक-दोन नाही तर दहा वर्षे एकमेकांना डेट करत होते. नेहा मिस इंडिया व्हायच्या आधी ती रित्विकला भेटली होती. इथूनच दोघांची मैत्री झाली आणि पुढे प्रेम. दोघेही लग्न करणार असे वाटत असतानाच 2010 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले आणि रित्विकने मॉडेल पिया त्रिवेदीसोबत लग्न केले.

युवराज सिंग

2014 मध्ये नेहा आणि युवराज सिंग यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. दोघेही अनेकदा इव्हेंला एकत्र दिसू लागले. पण दोन महिन्यांतच नेहाने युवराजला डेट करत असल्याच्या चर्चा धुडकावून लावल्या होत्या.

जेम्स सिल्वेस्टर


युवराज सिंगनंतर नेहाच्या आयुष्यात एका मिस्ट्री मॅनची एन्ट्री झाली. त्याचे नाव जेम्स सिल्वेस्टर. मुळचा व्हेनेझूएलाचा जेम्स पेशाने डेंटिस्ट आहे. नेहासोबतच्या रिलेशनशिपबद्दल जेम्स इतका गंभीर होता की, तो भारतात शिफ्टही झाला. मात्र नंतर अमेरिकेत परतला. यानंतरही नेहा व जेम्स एकमेकांच्या संपर्कात होते. पण यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. नेहा जेम्सला प्रेमाने जिम्मी बोलवायची. ब्रेकअपची गोष्ट खुद्द नेहानेच मीडियाला सांगितली होती.

जेम्ससोबतच्या ब्रेकअपमधून सावरायला बरीच वर्षे लागली. अंगद बेदीने नेहाला लग्नासाठी प्रपोज केले. त्याला होकार देण्यासाठी नेहाने चार वर्षांचा वेळ घेतला. अखेर वयाच्या 37 व्या वर्षी स्वत:पेक्षा दोन वर्षे लहान अंगदसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Web Title: Birthday special neha dhupia boyfriends list from ritwik bhattacharya to angad bedi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.