ठळक मुद्दे2015 मध्ये ऋषी कपूर यांनी मिनाक्षीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोत मिनाक्षीला ओळखणे कठीण झाले होते.

80 व 90 च्या दशकात प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे मिनाक्षी शेषाद्री. दामिनी, हिरो, घातक असे सुपरहिट सिनेमे देणा-या मिनाक्षीने स्वबळावर बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शक व अभिनेत्यांसोबत तिने काम केले. त्या काळातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाऊ लागली. पण नाव, प्रसिद्धी, पैसा असे सगळे काही असताना मिनाक्षीने सिनेसृष्टीला रामराम ठोकला. केवळ बॉलिवूडच नाही तर देश सोडून ती परदेशात स्थायिक झाली.  

 बॉलिवूडची ही ‘दामिनी’ सध्या कुठे आहे, काय करते? हे जाणून घेण्यास अनेक जण उत्सुक असतील. आज मिनाक्षीच्या वाढदिवसानिमित्त आम्ही याबद्दल सांगणार आहोत.

होय, मिनाक्षी सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे. 1995 मध्ये मिनाक्षीने अमेरिकेत राहणारा इनव्हेस्टमेंट बँकर हरीश मैसूरसोबत लग्न केले. विशेष म्हणजे, लग्नाची बातमी तिने बराच काळ दडवून ठेवली.

लग्नानंतरही ती चित्रपटात काम करत राहिली. पण अखेर मिनाक्षीच्या लग्नाचा खुलासा झाला आणि यानंतर मिनाक्षीने अचानक बॉलिवूड सोडून पतीसोबत परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. यानंतर ती कधीही चित्रपटात दिसली नाही.

गेल्या काही वर्षांत मिनाक्षी कमालीची बदलली आहे. इतकी की, तिला ओळखणेही कठीण आहे. मिनाक्षीला एक मुलगा व एक मुलगी आहे.

मिनाक्षीने फिल्म इंडस्ट्रीला जरी रामराम ठोकला असला तरीदेखील ती आपली नृत्याची आवड जोपासत आहे. टेक्सासमध्ये स्थायिक झालेल्या मिनाक्षीने तेथे कथ्थक अकादमी उघडली असून तरुणींना नृत्याचे धडे देते.

2015 मध्ये ऋषी कपूर यांनी मिनाक्षीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोत मिनाक्षीला ओळखणे कठीण झाले होते. खुद्द ऋषी कपूर यांनी सुरुवातीला मिनाक्षीला ओळखले नव्हते. मिनाक्षीला इतके बदललेले बघून त्यांनाही धक्का बसला होता.


 

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: birthday special meenakshi sheshadri then and now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.