शाळेत असतानाच  प्रेमात पडला होता मनीष पॉल, पाहा, ‘मिकी वायरस’च्या पत्नीचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 08:00 AM2019-08-03T08:00:00+5:302019-08-03T08:00:02+5:30

मनीष पॉल हे नाव आज कुणाला ठाऊक नाही. होस्ट म्हणून मनीषने आपली ओळख निर्माण केली. आज तो इंडस्ट्रीचा नंबर 1 होस्ट आहे. केवळ इतकेच नाही तर अभिनेता म्हणूनही त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे.  

birthday special manish paul wife, love story | शाळेत असतानाच  प्रेमात पडला होता मनीष पॉल, पाहा, ‘मिकी वायरस’च्या पत्नीचे फोटो

शाळेत असतानाच  प्रेमात पडला होता मनीष पॉल, पाहा, ‘मिकी वायरस’च्या पत्नीचे फोटो

googlenewsNext
ठळक मुद्देसंघर्षाच्या काळात संयुक्ता मनीषच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.

मनीष पॉल हे नाव आज कुणाला ठाऊक नाही. होस्ट म्हणून मनीषने आपली ओळख निर्माण केली. आज तो इंडस्ट्रीचा नंबर 1 होस्ट आहे. केवळ इतकेच नाही तर अभिनेता म्हणूनही त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे.  
छोट्या पडद्यावरुन मोठ्या पडद्यापर्यंत यशस्वी वाटचाल करणारा या हरहुन्नरी अभिनेत्याचा (3 ऑगस्ट) आज वाढदिवस.   3 ऑगस्ट 1981 रोजी मुंबईत मनीषचा जन्म झाला. पण त्याचे अख्खे बालपण दिल्लीत गेले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो मुंबईत दाखल झाला.


 
 2002 मध्ये पहिल्यांदा ‘संडे टेंगो’ हा स्टार प्लस वाहिनीवरील शो होस्ट करण्याची संधी त्याला मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले. यानंतर झी म्युझिक वाहिनीसाठी व्हीजे म्हणून त्याने काम केले. रेडिओ सिटी या रेडिओ वाहिनीवर मनीषने रेडिओ जॉकी म्हणूनही त्याने काम केले आणि बघता बघता छोट्या पडद्यावरचा नंबर 1 होस्ट बनला. पुढे अभिनयक्षेत्रातही तो आला.

स्टार वन वाहिनीवरील ‘घोस्ट बना दोस्त’ या मालिकेत मनीषने भूताची भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘राधा की बेटियां कुछ कर दिखाएंगी’, ‘जिंदादिल‘, ‘श२२२२ फिर कोई है’,‘कहानी शुरू विथ लव गुरू’ या मालिकांमध्ये अभिनय केला. लवकरच त्याला बॉलिवूडमध्ये संधी मिळाली. अक्षय कुमार आणि कतरीना कैफ स्टारर ‘तीस मार खान’ तो झळकला. 2013 मध्ये ‘मिकी वायरस’ या सिनेमात तो लीड हीरो म्हणून तो दिसला.  


 


 
मनीषने 2007 मध्ये बंगाली तरुणी संयुक्तासह लग्न केले. संयुक्ता आणि मनीष एकाच शाळेत शिकत होते. तिथून त्यांची प्रेमकहाणी सुरु झाली. 1998 मध्ये त्यांनी डेटिंगला सुरुवात केली. पण करिअर मार्गी लागल्यावरच लग्न करायचे असा दोघांचाही निर्णय होता. अखेर मनीषची करिअरची गाडी रुळावर आली आणि त्याने संयुक्ताशी लग्न थाटले. या दाम्पत्याला एक मुलगी व एक मुलगा अशी दोन अपत्ये आहेत.  

संघर्षाच्या काळात संयुक्ता मनीषच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. एकदा मनीष याबद्दल बोलला होता. ‘माझी पत्नी माझा आदर्श आहे. आज मी जे काही आहे, ते तिच्यामुळे. लग्नानंतर घराची संपूर्ण जबाबदारी तिने स्वत:च्या खांद्यावर घेतली. जेणेकरून मी माझे करिअर करू शकेल,’ असे तो म्हणाला होता.

Web Title: birthday special manish paul wife, love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.