‘आशिकी गर्ल’ने एका रात्रीत गमावले स्टारडम; मन हेलावणारी आहे अनुची गोष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 08:00 AM2020-01-11T08:00:00+5:302020-01-11T08:00:02+5:30

होय, ‘आशिकी’ने तिला एका रात्रीत स्टार केले आणि नियतीने एकाच रात्रीत तिला बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेपासून दूर केले.

birthday special mahesh bhatt film ashiqui actress anu aggarwal change life | ‘आशिकी गर्ल’ने एका रात्रीत गमावले स्टारडम; मन हेलावणारी आहे अनुची गोष्ट 

‘आशिकी गर्ल’ने एका रात्रीत गमावले स्टारडम; मन हेलावणारी आहे अनुची गोष्ट 

googlenewsNext
ठळक मुद्देअनु सध्या बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेपासून दूर बिहारमध्ये राहाते.

1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी’ या सिनेमाने लोकांना अक्षरश: वेड लावले. यातली गाणीही तुफान गाजली. राहुल रॉय आणि अनु अग्रवाल या जोडीनेही लोकांच्या मनात घर केले. आजही या जोडीला लोक विसरू शकलेले नाहीत, हेच या चित्रपटाचे यश आहे. काळाच्या ओघात अनु व राहुल बॉलिवूडपासून दुरावले. राहुल एकापाठोपाठ एक फ्लॉप चित्रपटांमुळे बॉलिवूडमधून दूर फेकला गेला तर अनुला नियतीने बॉलिवूडमधून जाण्यास भाग पाडले. होय, ‘आशिकी’ने तिला एका रात्रीत स्टार केले आणि नियतीने एकाच रात्रीत तिला बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेपासून दूर केले. एका अपघाताने तिचे अख्खे आयुष्य बदलले.  
 ही अनू आता कुठे आहे याविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

‘आशिकी’नंतर अनूचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले होते.  करियर रुळावर आणण्याचा प्रयत्न करत असतानाच 1999 मध्ये तिच्या गाडीला अपघात झाला.  १९९९ मध्ये एका रात्री पार्टीहून घरी परतत असताना अनुच्या गाडीला भीषण अपघात झाला. एका कारने तिच्या कारला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, अनु रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. भर रस्त्यात झालेल्या या अपघातानंतरही अनुला कोणी ओळखूही शकले नव्हते.

कुणीतरी पोलिसांना कॉल केला आणि  पोलिसांनी जखमी अवस्थेतील अनुला ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल केले. या अपघातानंतर अनु जवळपास २९ दिवस कोमात गेली. इतकेच नाही तर तिची स्मरणशक्तीही गेली.

सुदैवाने ती कोमातून बाहेर आली पण तोपर्यंत आयुष्य बदलले होते. भूतकाळातील काहीही अनुला आठवेना. पुढे  स्मरणशक्ती परत मिळवण्यासाठी अनु बिहार येथील मुंगेरस्थित प्रसिद्ध योग साधना केंद्रात गेली. स्मरणशक्ती पुन्हा मिळविण्यासाठी तिने कठीण योगसाधना केली. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर अनुची स्मरणशक्ती पूर्वपदावर आली खरी. पण तोपर्यंत बराच काळ लोटला होता. या काळात बॉलिवूडमधील लोकांनाही तिचा विसर पडला होता.

आजारपणातून बाहेर आल्यानंतर तिने तिची सगळी संपत्ती दान केली आणि संन्यास घेतला.  2015 मध्ये "Anusual- Memoir of a Girl who Came Back from the Dead" हे स्वत:च्या आयुष्यावरचे पुस्तक तिने लिहिले.  हे पुस्तक प्रचंड गाजले होते.

अनु सध्या बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेपासून दूर बिहारमध्ये राहाते. तिथे ती योगा शिकवते. गेल्या काही वर्षांत अनुमध्ये इतका बदल झाला आहे की तिला आता ओळखणे देखील कठीण झाले आहे. 
 

Web Title: birthday special mahesh bhatt film ashiqui actress anu aggarwal change life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.