ठळक मुद्दे2003 मध्ये करिश्माने बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केले.  2016 मध्ये करिश्माने पती संजय कपूरपासून घटस्फोट घेतला. 

शोमॅन राजू कपूर यांची नात आणि अभिनेता रणधीर कपूर आणि बबीता यांची कन्या करिश्मा कपूर हिचा आज (25 जून) वाढदिवस. 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवणा-या करिश्माने 1991 मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला. पण दुर्दैवाने करिश्माचा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला. त्यानंतर एकामागून एक करिश्माचे तब्बल 12 चित्रपट फ्लॉपच्या यादीत जमा झाला होते. या अपयशामुळे करिश्मा खचून गेली होती. इतकी की, ती रात्ररात्र नुसती रडायची.  पदार्पणाच्या चार वर्षांनंतर करिश्माला यशाची चव चाखायला मिळाली.

1994 मध्ये आलेल्या ‘राजा बाबू’  या चित्रपटाने करिश्माला स्टार बनवले. पण आज ही स्टार बॉलिवूडमधून गायब आहे. 2012 मध्ये आलेल्या ‘डेंजरस इश्क’ यात ती अखेरची झळकली होती.

2002 मध्ये करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चनचा साखरपुडा झाला होता. पण हा साखरपुडा तुटला. पुढे 2003 मध्ये करिश्माने बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केले.  2016 मध्ये करिश्माने पती संजय कपूरपासून घटस्फोट घेतला. 

 करिश्मा कपूरबद्दलची आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे, तिचे वडील रणधीर कपूर यांना तिचे लग्न अक्षय खन्नाशी व्हावे असे वाटत होते. असे म्हणतात की, रणधीर यांनी करिश्मासाठी अक्षय खन्नाची निवड केली होती. विनोद खन्ना यांच्याकडे त्यांनी तसा प्रस्तावही पाठवला होता. पण एक व्यक्ति या लग्नाआड आली आणि हे लग्न होता होता राहिले. होय, करिश्माची आई बबीता यांनी या लग्नाला विरोध केला. त्याकाळात करिश्मा यशाच्या शिखरावर होती. करिश्माने याकाळात लग्न करू नये, अशी बबीतांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेखातर करिश्माच्या लग्नाचा विषय मागे पडला आणि अक्षय व करिश्माच्या लग्नाची बोलणीही थांबली.


Web Title: birthday special know about karisma kapoor wedding story with akshaye khanna
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.