Birthday Special : ‘गँगस्टर’ची गर्लफ्रेन्ड बनली नसती तर पॉर्न स्टार असती कंगना राणौत...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 08:00 AM2020-03-23T08:00:00+5:302020-03-23T08:00:02+5:30

बेधडक, बिनधास्त कंगनाचा आज वाढदिवस

Birthday Special : kangana ranaut almost signed an porn film before her film gangster | Birthday Special : ‘गँगस्टर’ची गर्लफ्रेन्ड बनली नसती तर पॉर्न स्टार असती कंगना राणौत...!!

Birthday Special : ‘गँगस्टर’ची गर्लफ्रेन्ड बनली नसती तर पॉर्न स्टार असती कंगना राणौत...!!

googlenewsNext
ठळक मुद्देबेधडक कंगनाने आपल्या फिल्मी करिअरच्या सुरुवातीपासून अनेकांशी ‘पंगा’ घेतला. आजही हा ‘सिलसिला’ सुुरुच आहे.

कंगना राणौत म्हणजे बॉलिवूडची बेधडक, बिनधास्त अभिनेत्री.  अनेक बड्या बड्यांना शिंगावर घेणारी, परखड बोलणारी आणि आपल्या अटींवर जगणाºया बॉलिवूडच्या या क्विनने स्वबळावर यश मिळवले. बंडखोरी आधीपासूनच अंगात होती. बॉलिवूडमध्ये हाच बंडखोर स्वभाव कंगनाची ओळख बनला.

 खरे तर कंगना डॉक्टर बनावी, अशी तिच्या कुुटुंबियांची इच्छा होती. पण कंगनाला डॉक्टर बनण्यात काहीही इंटरेस्ट नव्हता. अभिनेत्री बनायच्या महत्त्वाकांक्षेने तिला झपाटले होते. मग काय ही पठ्ठी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता घरातून पळाली आणि दिल्लीत पोहोचली. पुढे मुंबईतही आली. पण इथे स्ट्रगल करता करता एक वेळ अशी आली की, कंगनाने अ‍ॅडल्ट सिनेमा साईन केला.

होय, Vh1 Inside Access या टीव्ही शोमध्ये कंगनाने स्वत: हा खुलासा केला होता. तिने सांगितले होते की,  मी बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करत होते. अशात मला एक चित्रपट मिळाला. तो चित्रपट साईन करताना आपल काहीतरी चुकतय, हे जाणवत होते. पण हातात काम नव्हते. दुसरा पर्याय नव्हता. मी ठीक आहे, म्हणून तो साईन केला. याच चित्रपटासाठी मला फोटोशूट करायचे होते.  मी फोटोशूटसाठी त्याठिकाणी पोहोचले तेव्हा मात्र हे सगळे अश्लिल असल्याची जाणीव प्रकर्षाने झाली. हे करणे चुकीचे आहे, असे मला वाटले. कारण खरोखर तो चित्रपट माझ्यासाठी योग्य नव्हता.  अनुराग बासूने  मला ‘गँगस्टर’ या चित्रपटात भूमिका दिली नसती तर आज मी कदाचित पोर्न इंडस्ट्रीत असती. ’

‘गँगस्टर’ या चित्रपटासाठी मला बरेच आॅडिशन्स द्यावे लागले. तसेच मला कित्येक महिने प्रतीक्षा करावी लागली. परंतु पण या चित्रपटाने माझ्या करिअरची दिशाच बदलली.  या चित्रपटानंतर मी माझ्या अभिनयावर खूप मेहनत घेतली. पुढे एकापेक्षा एक चॅलेंजिंग अशा भूमिका साकारल्या, असेही तिने सांगितले होते.

Web Title: Birthday Special : kangana ranaut almost signed an porn film before her film gangster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.