ठळक मुद्देजेबा आणि जावेद यांनी लपूनछपून लग्न केले होते. पण काहीच महिन्यांमध्ये ते दोघे वेगळे झाले. जेबा आणि जावेदचे लग्न झाले असले तरी तिने मीडियात या गोष्टीला नकार दिला होता. पण जावेदने ‘निकाहनामा’ दाखवल्यावर सत्य जगासमोर आले होते.

जावेद जाफरीचा आज वाढदिवस असून प्रसिद्ध अभिनेते जगदीप यांचा जावेद मुलगा आहे. जगदीप यांनी त्यांच्या अभिनयाने बॉलिवूडचा एक काळ गाजवला. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत जावेदने 1985 ला मेरी जंग या चित्रपटाद्वारे त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या पहिल्याच चित्रपटातील त्याच्या खलनायकाच्या भूमिकेचे आणि डान्सिंग कौशल्याचे चांगलेच कौतुक झाले. त्याने त्यानंतर 100 डेज, धमाल, तारा रम पम, टोटल धमाल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. त्याच्या बुगी वुगी या डान्सिंग कार्यक्रमाला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. जावेद त्याच्या अभिनयाइतकाच त्याच्या नृत्यासाठी ओळखला जातो. त्याच्या डान्सिंगची नेहमीच तारीफ केली जाते.

जावेद जाफरीचे लग्न हबिबा जाफरीसोबत झालेले असून त्यांना मीजान, अब्बास आणि अल्विरा अशी तीन मुले आहेत. तुम्हाला माहीत आहे का, जावेद जाफरीचे हबिबाच्या आधी एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत लग्न झाले होते. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून हिना या प्रसिद्ध चित्रपटात झळकलेली जेबा बख्तियार आहे. हिना या चित्रपटात जेबाने ‘हिना’ नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. ‘मैं हू खुशरंग हिना’ हे या चित्रपटाचे गाणे तुफान लोकप्रिय झाले होते. जेबा आणि जावेद यांनी लपूनछपून लग्न केले होते. पण काहीच महिन्यांमध्ये ते दोघे वेगळे झाले. जेबा आणि जावेदचे लग्न झाले असले तरी तिने मीडियात या गोष्टीला नकार दिला होता. पण जावेदने ‘निकाहनामा’ दाखवल्यावर सत्य जगासमोर आले होते.

जेबाचे लग्न प्रसिद्ध गायक अदनान सामीसोबत देखील झाले होते. अदनान आणि जेबा यांना एक मुलगा झाला. त्यांचे लग्न केवळ दोन वर्षे टिकले. १९९७ मध्ये ते दोघे विभक्त झाले. तिचे पहिले लग्न सलमान वालियानीसोबत झाले होते. त्यांना एक मुलगीही झाली. पण हे देखील लग्न फार काळ टिकले नाही. बॉलिवूडमध्ये करियर संपल्यानंतर जेबा पाकिस्तानला परतली. तिथे तिने सोहेल खान लेगारीसोबत लग्न केले. जेबाने एक नाही, दोन नाही तर तब्बल चार लग्न केलीत.

Web Title: Birthday Special: Javed Jaffrey was married to heena fame Zeba Bakhtiar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.