ठळक मुद्देतब्बूने कधीही या घटनेचा उल्लेख केलेला नाही. ही घटना घडली तेव्हा तब्बू तेव्हा 14- 15 वर्षांची असावी.

आपल्या दर्जेदार अभिनयाने बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री तब्बू हिचा आज वाढदिवस.  4 नोव्हेंबर 1971 रोजी हैदराबाद येथे तब्बूचा जन्म झाला.  वयाच्या उण्यापु-या 15 व्या वर्षी तब्बू इंडस्ट्रीत आली आणि इथलीच बनून राहिली. ( तब्बूने तिच्या फिल्म करिअरची सुरुवात 15 व्या वर्षी केली होती. 1985 मध्ये प्रदर्शित झालेला ‘हम नौजवान’ या सिनेमात तिने देव आनंद यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. )

आपल्या फिल्मी करिअरमध्ये तब्बूने अनेक हिट चित्रपट दिलेत. तिचे पर्सनल लाईफही चर्चेत राहिले. आजही अविवाहित असलेल्या तब्बूचे साऊथ सुपरस्टार नागार्जुनसोबतचे  अफेअर चांगलेच गाजले होते. शिवाय तिच्या आयुष्यातील एका घटनेचीही बरीच चर्चा  तेव्हा रंगली होती. तब्बू यावर कधीच बोलली नाही. कदाचित तब्बू यावर बोलली असती तर एका अभिनेत्याचे करिअर  उद्धवस्त झाले असते. तो अभिनेता कोण तर जॅकी श्रॉफ.

होय, तब्बूने त्या भयावह घटनेवर मौन बाळगणे पसंत केले. पण  तब्बूची मोठी बहिण फराह नाज हिने याबाबत खुलासा केला होता.
1986 मध्ये फराह आणि जॅकी श्रॉफ ‘दिलजला’ फिल्मचे शूटिंग करत होते. त्याकाळात तब्बू नेहमी आपल्या बहिणीसोबत सेटवर जात होती. या फिल्म मध्ये डॅनी खलनायकाच्या भूमिकेत होता.  शूटिंग संपल्यानंतर सगळी स्टारकास्ट डॅनीच्या घरी पार्टी करायचे. एकदिवस  फराह  तब्बूसोबत या पार्टीला गेली. जॅकीही या पार्टीत होता. पण जॅकीने एवढी दारू प्यायली होती, की तो तब्बूसोबत बळजबरी करायला लागला.

फराहने एका मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला होता. ‘डॅनी  तब्बूला वाचवण्यासाठी पुढे आले नसते तर जॅकीने तब्बूला बदनाम करण्याचेच ठरवले होते,’ असे फराह म्हणाली होती.

तब्बूने कधीही या घटनेचा उल्लेख केलेला नाही. ही घटना घडली तेव्हा तब्बू तेव्हा 14- 15 वर्षांची असावी. हेच कारण आहे की, आपल्या अख्ख्या करिअरमध्ये तब्बूने बहुतेक सर्वच अभिनेत्यांसोबत काम केले आहे, मात्र आजपर्यंत तिने आतापर्यंत जॅकी श्रॉफसोबत काम केलेले नाही. 

Web Title: Birthday Special : jackie shroff and tabu controversy on shooting movie diljala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.