मोजून आठ सिनेमे अन् बॉलिवूडमधून गायब झाली अभिनेत्री रिमा सेन

By रूपाली मुधोळकर | Published: October 29, 2020 12:31 PM2020-10-29T12:31:56+5:302020-10-29T12:34:12+5:30

सध्या काय करते ‘ गँग्स ऑफवासेपूर’ची ही अभिनेत्री

birthday special gangs of wasseypur co-star reema sen bold photoshoot controversy | मोजून आठ सिनेमे अन् बॉलिवूडमधून गायब झाली अभिनेत्री रिमा सेन

मोजून आठ सिनेमे अन् बॉलिवूडमधून गायब झाली अभिनेत्री रिमा सेन

googlenewsNext
ठळक मुद्दे 2006 मध्ये रिमाने एक फोटोशूट केले. पण तिचे हे फोटोशूट वादात सापडले.

मालामाल वीकली, जाल-दी ट्रॅप आणि गँग्स ऑफ वासेपूर यासारख्या चित्रपटांत दमदार अ‍ॅक्टिंग करणा-या अभिनेत्रीला यशाने हुलकावणी दिली आणि ती संसारात रमली. या अभिनेत्रीचे नाव आहे रिमा सेन. आज रिमा सेनचा वाढदिवस.
29 ऑक्टोबर 1981 रोजी कोलकात्यात रिमाचा जन्म झाला. कोलकात्यात शिक्षण पूर्ण केल्यावर रिमाने मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आणि पाठोपाठ बंगाली सिनेमा आणि मालिकांमध्ये काम करू लागली.

 कोलकात्यात जन्मलेल्या रिमाने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई गाठली. कुटुंबासोबत ती मुंबईला शिफ्ट झाली. पुढे तिला मॉडेलिंगची दुनिया खुणावू लागली. मॉडेलिंग करताना रिमाने अनेक जाहिरातीत काम केले आणि याचदरम्यान तिला तेलगु चित्रपटांच्या आॅफर्स आल्या. रिमाचा पहिला तेलगू चित्रपट होता, ‘चित्रम’. हा पहिलाच चित्रपट सुपरडुपर हिट झाला. यानंतर रिमाने बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला.

 रिमाने बॉलिवूडमधील आपल्या फिल्मी करिअरमध्ये मोजून फक्त आठ सिनेमांत काम केले. पण तिला म्हणावे तसे यश मिळू शकले नाही. मग काय, बॉलिवूड सोडून तिने संसार थाटण्याचा निर्णय घेतला.

‘हम हो गए आपके’ या चित्रपटाद्वारे रिमाने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. यात रिमाच्या अपोझिट फरदीन खान मुख्य भूमिकेत होता. 2001 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट दणकून आपटला. पुढे रिमाच्या वाट्याला भूमिका आल्यात. पण त्या सगळ्या सहाय्यक अभिनेत्रीच्या.

 2006 मध्ये रिमाने एक फोटोशूट केले. पण तिचे हे फोटोशूट वादात सापडले. तामिळ न्यूजपेपरसाठी केलेल्या या फोटोशूट प्रकरणी रिमाविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी झाला होता. रिमासोबत या प्रकरणात शिल्पा शेट्टीचेही नाव होते. रिमा व शिल्पाचे हे फोटोशूट अश्लिल असल्याचा आरोप होता.


 
2012 मध्ये रिमा ‘गँग्स ऑफ वासेपूर’मध्ये दिसली. या चित्रपटातील तिच्या बोल्ड सीन्सची जोरदार चर्चा झाली. पण करिअरमध्ये रिमाला याचा काहीही फायदा झाला नाही.  तिने बिझनेसमॅन शिवकरण सिंगसोबत लग्न केले. सध्या रिमा तिच्या मॅरेज लाईफमध्ये आनंदी आहे. तिला एक मुलगाही आहे.

Web Title: birthday special gangs of wasseypur co-star reema sen bold photoshoot controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.