ठळक मुद्देएकीकडे अजय व करिश्माचे ब्रेकअप झाले. दुसरीकडे काजोलचेही तिच्या मित्रासोबत ब्रेकअप झाले होते.

बॉलिवूडची ब्युटी काजोल हिचा आज वाढदिवस. कुछ कुछ होता है, दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे, प्यार तो होना ही था, कभी खुशी कभी गम असे अनेक हिट सिनेमे देणारी काजोल आजही बॉलिवूडमध्ये अ‍ॅक्टिव्ह आहे. अजय देवगणसोबतचा संसार आणि करिअर हे दोन्ही लिलया सांभाळतेय. आज अजय व काजोल हे बॉलिवूडचे परफेक्ट कपल मानले जाते. अर्थात लग्नापूर्वी काजोलमुळेच अजयचे करिश्मा कपूरसोबतचे नाते तुटले होते. होय, आज आम्ही याचबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

काजोल आयुष्यात येण्यापूर्वी अजय करिश्माच्या प्रेमात होता. अजय स्ट्रगल करत असताना तो करिश्माला भेटला होता. अजय स्ट्रगल करत होता आणि करिश्मा त्यावेळी आघाडीची अभिनेत्री होती. पण अजय व करिश्माच्या अफेअरच्या चर्चा जोरात सुरु होत्या. दोघांनीही कधीच आपल्या नात्याची कबुली दिली नाही. पण चर्चा खरी मानाल तर अजय व करिश्मा बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. पण काजोलमध्ये हे नाते तुटले.

होय, तर अजय आणि काजोलची पहिली भेट 1995 मध्ये मध्ये ‘हलचल’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. अजयला भेटण्याआधीपासून काजोल तिच्या एका मित्राला डेट करत होती. म्हणजेच अजय करिश्माच्या प्रेमात होता आणि काजोल तिच्या दुसºयाच एका मित्राच्या प्रेमात होती. पण काजोलच्या लव्ह लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स सुरु होते. अजय व काजोलची चांगली मैत्री झाल्यावर काजोल तिचे हे प्रॉब्लेम अजयसोबत शेअर करायची. 

तर एकेदिवशी काजोल आपले हेच प्रॉब्लेस अजयसोबत शेअर करत बसली होती. याचदरम्यान अजयला करिश्माचा फोन आला आणि फोनवर बोलत असताना तिला एका मुलीचा आवाज ऐकू आला.

याचा अर्थ काय तर अजय दुस-या मुलीसोबत आहे, असा अंदाज करिश्माने लावला. पुढे अजयसोबत एका खोलीत असलेली ती मुलगी काजोल असल्याचे करिश्माला कळले आणि इथून अजय व करिश्मांमध्ये गैरसमज वाढू लागला. याची परिणीती काय तर बे्रकअप.
एकीकडे अजय व करिश्माचे ब्रेकअप झाले. दुसरीकडे काजोलचेही तिच्या मित्रासोबत ब्रेकअप झाले होते. यानंतर काय झाले, हे तुम्हाला ठाऊक आहेच.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: birthday special controversial love story of kajol and ajay devgan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.