Birthday Special : अमिताभ बच्चन यांच्या ‘पुनर्जन्मा’ची कथा, वाचून थक्क व्हाल 

By रूपाली मुधोळकर | Published: October 11, 2020 02:50 PM2020-10-11T14:50:56+5:302020-10-11T14:53:47+5:30

अमिताभ यांनी स्वत: त्यांच्या ब्लॉगमध्ये हा किस्सा सांगितला होता.

birthday special : amitabh bachchan told his reincarnation story on his birthday | Birthday Special : अमिताभ बच्चन यांच्या ‘पुनर्जन्मा’ची कथा, वाचून थक्क व्हाल 

Birthday Special : अमिताभ बच्चन यांच्या ‘पुनर्जन्मा’ची कथा, वाचून थक्क व्हाल 

googlenewsNext
ठळक मुद्दे. संघर्षाच्या काळात मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर अनेक रात्री काढावे लागणारे अमिताभ आज बॉलिवूडचे ‘शहेनशाह’ म्हणून ओळखले जातात.

बॉलिवूडचे ‘शहंशाह’ अमिताभ बच्चन आज 78 वर्षांचे झालेत. आज वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. या वयातही अमिताभ  त्याच उत्साहाने काम करत आहेत. सोशल मीडियवरही ते अ‍ॅक्टिव्ह आहेत. आज बिग बींच्या वाढदिवसानिमित्त त्यांनीच सांगितलेला एक मजेशीर किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अमिताभ यांनी स्वत: त्यांच्या ब्लॉगमध्ये हा किस्सा सांगितला होता.
आपल्या 74 व्या वाढदिवशी त्यांनी एक ब्लॉग लिहिला होता. या ब्लॉगमध्ये या घटनेचा उल्लेख होता. ‘74 वर्षांपूर्वी माझ्या वडिलांना एक स्वप्न पडले होते आणि मी जन्मलो होतो,’ असे लिहित त्यांनी हा मजेशीर किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला होता.

काय होता किस्सा...
अमिताभ यांनी हा किस्सा सांगताना लिहिले होते, माझ्या जन्माची ही कथा. माझी आई प्रेग्नंट होती. मात्र प्रसूतीला बराच वेळ होता. याचदरम्यान अचानक एका रात्री माझ्या वडिलांना स्वप्न पडले. बाबूजींच्या स्वप्नात त्यांचे वडील (अमिताभ यांचे आजोबा) आले होते. ऊठ, तुझ्या घरी मुलगा येणार आहे, असे स्वप्नात बाबूजींना त्यांचे बाबूजी म्हणाले.  ते शब्द ऐकून माझे वडील खाडकन् उठले. पाहतात काय तर आई बिछाण्यावर नव्हती.

ती बाथरूममध्ये होती आणि तिथेच पडली होती. तिला प्रसूती कळा सुरु होत्या. काही तासानंतर माझ्या आईने एका मुलाला जन्म दिला. तो म्हणजे मी.  माझे बाबूजी हरिवंशराज बच्चन यांचा पुनर्जन्मावर विश्वास होता. त्यांच्यापोटी माझ्यारूपात त्यांचे बाबूजी प्रताप नारायण श्रीवास्तव यांचा पुनर्जन्म झाल्याचे ते मानत. आईवडिलांच्या पोटी माझा पुनर्जन्म आहे की नाही, मला माहित नाही. मात्र परमेश्वराचा आशीर्वाद, मोठ्यांचे प्रेम व प्रार्थना आणि नशीबाने मला कायम सोबत दिली. माझ्यावर प्रेम करणा-या सर्वांचा मी ऋणी आहे.

अमिताभ आणि इन्कलाब
अमिताभ यांच्या मातोश्री तेजी बच्चन यांनी अमिताभ यांचे ‘इन्कलाब’ असे नामकरण केले होते, असे मानले जाते. केबीसीच्या सेटवर अमिताभ यांनी या नावामागणी कथा ऐकवली होती. त्यांनी सांगितले होते की, सन 1942 मध्ये गांधींजींचे  भारत छोडो आंदोलन  सुरू होते. आमच्या शहरात या आंदोलनाने जोर पकडला होता. लोक रस्त्यावर उतरुन ‘इन्कलाब जिंदाबाद’च्या घोषणा देत होते.  माझी आई तेजी बच्चन या आंदोलनाने प्रचंड प्रभावित झाली होती. एक दिवस तिला मोर्चा दिसला आणि ती मोर्चात सहभागी झाली. त्यावेळी मी आईच्या पोटात होतो आणि माझी आई आठ महिन्यांची गर्भवती होती. आई मोर्चात जोरजोरात ‘इन्कलाब जिंदाबाद’च्या घोषणा देत होती आणि इकडे घरातील सगळेजण आईला शोधत होते.  अखेर ती सापडली. पण आठ महिन्यांची गर्भवती असताना मोर्चात गेल्याबद्दल तिला सगळ्यांनीच धारेवर धरले. ‘तू इन्कलाबची एवढी समर्थक आहेस तर तुझ्या बाळाच्या जन्मानंतर त्याचे नावही इन्कलाब ठेवले जाईल,’असे तिला सगळेजण म्हणाले. आईसोबत घडलेला हा किस्सा जवळजवळ सर्वांनाच माहित असल्याने माझ्या जन्मानंतर खरच माझे नाव इन्कलाब ठेवण्यात आले, असा अनेकांना वाटते. पण असे काहीही नाही. माझे खरे नाव अमिताभ हेच आहे. माझ्या जन्मानंतर माझ्या वडिलांचे एक अतिशय जवळचे मित्र आमच्या घरी आले होते. त्यांनी मला पाहिल आणि माझे अमिताभ असे नामकरण केले होते. त्यामुळे अमिताभ हेच माझे खरे नाव आहे. 

मुझसे ना हो पाएगा... म्हणत अमिताभ बच्चन ढसाढसा रडले; पण मेहमूद यांच्या हृदयाला फुटला नाही पाझर

Big B : सकाळी ‘झिरो’ अन् संध्याकाळी ‘हिरो’; ‘आनंद’ रिलीज झाला त्यादिवशीचा इंटरेस्टिंग किस्सा

 

Web Title: birthday special : amitabh bachchan told his reincarnation story on his birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.