Birthday Special : ‘बुनियाद’च्या ‘छोटी बहू’सोबत होते आलोक नाथ यांचे अफेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 10:20 AM2019-07-10T10:20:00+5:302019-07-10T10:21:11+5:30

बॉलिवूडचे संस्कारी बाबू म्हणून ओळखले जाणारे आलोकनाथ यांच्यावर गतवर्षी गैरवर्तनाचे आरोप झालेत आणि अख्खे बॉलिवूड ढवळून निघाले. आलोकनाथ यांनी आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळले. याच आलोक नाथ यांचा आज वाढदिवस.

Birthday Special : alok nath affair with cast buniyaad neena gupta | Birthday Special : ‘बुनियाद’च्या ‘छोटी बहू’सोबत होते आलोक नाथ यांचे अफेअर

Birthday Special : ‘बुनियाद’च्या ‘छोटी बहू’सोबत होते आलोक नाथ यांचे अफेअर

googlenewsNext
ठळक मुद्दे2018 हे वर्ष आलोक नाथ यांच्यासाठी चांगलेच अडचणीचे ठरले. ते मीटू मोहिमेच्या वावटळीत सापडले.

बॉलिवूडचे संस्कारी बाबू म्हणून ओळखले जाणारे आलोकनाथ यांच्यावर गतवर्षी गैरवर्तनाचे आरोप झालेत आणि अख्खे बॉलिवूड ढवळून निघाले. आलोकनाथ यांनी आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळले. याच आलोक नाथ यांचा आज (10 जुलै) वाढदिवस. 10 जुलै 1956 रोजी बिहारमध्ये जन्मलेल्या आलोक नाथ यांनी सुरूवातीच्या काळात लीड रोल केलेत. काही रोमॅन्टिक चित्रपटातही त्यांनी काम केले.  यानंतर काही चित्रपटात त्यांनी वयापेक्षा मोठ्या भूमिका साकारल्या आणि याच भूमिकांनी त्यांना ओळख मिळवून दिली. पुढे ते बॉलिवूडचे संस्कारी बाबू म्हणून ओळखले जाऊ लागलेत. 

आलोक नाथ यांनी 500 पेक्षा अधिक चित्रपट आणि 40-50 टीव्ही शोमध्ये काम केले. हिंदी, बांगला, तामिळ, राजस्थानी मालिकांतही ते झळकले. बुनियाद, भारत एक खोज, पिया का घर, वो रहने वाली महलों की, ये रिश्ता क्या कहलाता है अशा अनेक मालिका त्यांनी केल्या.

बुनियाद या मालिकेत त्यांनी बाबूजीची व्यक्तिरेखा साकारली. या सीरिअलमध्ये नीना गुप्ता यांनी ‘छोटी बहू’ची भूमिका साकारली होती. याच मालिकेदरम्यान आलोक नाथ व नीना गुप्ता यांच्या रोमान्सच्या बातम्या येऊ लागल्यात. पण हे नाते फार काळ टिकले नाहीत आणि दोघेही वेगळे झालेत.
एका मुलाखतीत आलोक नाथ आपल्या गर्लफ्रेन्डबद्दल बोलले होते. अर्थात त्यांनी तिचे नाव घेतले नव्हते. तरूणपणात मी खूप एन्जॉय केले. माझी गर्लफ्रेन्ड कमालीची क्रेजी होती, असे ते म्हणाले होते.

2018 हे वर्ष आलोक नाथ यांच्यासाठी चांगलेच अडचणीचे ठरले. ते मीटू मोहिमेच्या वावटळीत सापडले. इंडस्ट्रीतीलअनेक महिलांनी त्यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केलेत. टीव्ही प्रोड्यूसर विनता नंदा यांनी त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेत. अभिनेत्री दीपिका अमीन हिनेही आलोक नाथ यांच्यावर गंभीर आरोप ठेवलेत.

Web Title: Birthday Special : alok nath affair with cast buniyaad neena gupta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.