Birthday Special : अक्षय कुमारच्या संपत्तीचा आकडा ऐकून तुमचे डोळे होतील पांढरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 04:15 PM2019-09-09T16:15:10+5:302019-09-09T16:15:51+5:30

बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये अक्षय कुमारच्या नावाचा समावेश आहे.

Birthday Special: Akshay Kumar property | Birthday Special : अक्षय कुमारच्या संपत्तीचा आकडा ऐकून तुमचे डोळे होतील पांढरे

Birthday Special : अक्षय कुमारच्या संपत्तीचा आकडा ऐकून तुमचे डोळे होतील पांढरे

googlenewsNext


अक्षय कुमार आजच्या घडीला सर्वाधिक बिझी स्टार्सपैकी एक आहे. सध्या तो रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात बिझी आहे. अर्थात इथपर्यंतचा अक्षयचा प्रवास सोपा नव्हता. अक्षयला लहानपणापासून अभिनयाचे वेड होते. पण या स्वप्नाचा पाठलाग करताना अक्षयला अनेक नकार पचवावे लागले. सुरुवातीच्या स्ट्रगल काळातील एक किस्सा अक्षयने एका मुलाखतीत ऐकवला होता. बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये अक्षय कुमारच्या नावाचा समावेश आहे. 

अक्षय कुमारचा आज वाढदिवस असून त्याने बॉलिवूडमध्ये २९ वर्षांच्या करिअरमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. अक्षयचं खरं नाव राजीव ओम भाटिया असून बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी त्याने आपलं नाव अक्षय कुमार असं केलं.

अक्षयचा जन्म अमृतसरमध्ये झाला असला तरी तो लहानाचा मोठा चांदनी चौकमध्ये झाला. मुंबई, कोलकत्ता, थायलंड येथे आपलं नशीब आजमावल्यानंतर अक्षयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. २००१ मध्ये त्याने अभिनेत्री ट्विंकल खन्नाशी लग्न केलं. दोघांना दोन मुलं आहेत. 


मीडिया रिपोर्टनुसार, अक्षय कुमार प्रत्येक सिनेमासाठी साधारणपणे ३० कोटी रुपये मानधन घेतो. तर काहीवेळा अक्षयने प्रत्येक दिवसासाठी १ कोटी रुपये मानधन घेतल्याच्याही चर्चा झाल्या होत्या. फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अक्षयने २० ब्रँड साइन केले. तर प्रत्येक जाहिरातीच्या दर दिवसाच्या चित्रीकरणासाठी १ ते १.५ कोटी रुपये घेतो. तर रसना या ब्रँडने १८ कोटी रुपयांत तीन वर्षांचा करार अक्षयसोबत केला आहे.


इतकंच नाही तर अक्षय कुमारने हरी ओम एण्टरटेनमेन्ट आणि ग्रेझिंग गोट पिक्चर्स हे दोन प्रोडक्शन हाउस सुरू केले आहेत. या प्रोडक्शन अंतर्गत त्याने 'रुस्तम', 'पॅडमॅन' आणि 'ओह माय गॉड' या चित्रपटांची निर्मिती केली. याशिवाय जुहूमध्ये अक्षय आणि ट्विंकलचं समुद्र किनारी एक घर आहे. तसेच मॉरिशसमध्ये समुद्र किनारी मालमत्ता, टोरंटोमध्ये एक बंगला, कॅनडामध्ये एक टेकडी आणि अंधेरीमध्ये चार घरं आहेत. विशेष म्हणजे या चार घरांची प्रत्येकी किंमत साधारणपणे ४.५ कोटी ते ५ कोटी रुपये इतकी आहे.


अक्षयकडे रॉयस फॅंटॉम (सुमारे ८.९ कोटी), बेंटले कॉन्टिनेंटल फ्लाइंग स्पूर (सुमारे ३.२१ कोटी), पोर्श केयने (सुमारे १. ४ कोटी) आणि रेंज रोवर वोग (सुमारे २.७५ कोटी) या हाय क्लास गाड्या आहेत.

अक्षयकडे हार्ले डेव्हिडसन व्ही-रॉड, प्रायव्हेट जेट आहे. याशिवाय तो वर्ल्ड कबड्डी लिगचाही मालक आहे.

Web Title: Birthday Special: Akshay Kumar property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.