अभिनेत्री दिशा पटानी तिच्या सिनेमांपेक्षा अफेयर व कपड्यांमुळेच जास्त चर्चेत असते. १३ जूनला दिशाचा वाढदिवस असून तिने तेलगू सिनेमा लोफरमधून तिच्या करियरला सुरूवात केली होती. हा चित्रपट २०१५ साली प्रदर्शित झाला. तिने २०१६ साली एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.


२०१५ साली दिशा पटानीनेटायगर श्रॉफसोबत म्युझिक व्हिडिओ अल्बममध्ये काम केले. तेव्हापासून त्या दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरूवात केली. मधल्या काळात त्या दोघांमध्ये मतभेद झाल्याच्या बातम्या येत होत्या. या चर्चांकडे कानाडोळा करीत त्या दोघांनी त्यांच्यातील मतभेद दूर केले. 

ते दोघे एकत्र इव्हेंट्स व पार्टींमध्ये पहायला मिळतात.


दिशा बॉलिवू़डमधील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. नेहमी ती तिच्या कपड्यांमुळे ट्रोल होते. नुकतेच जेव्हा भारत चित्रपटाचे स्क्रीनिंग ठेवले होते. त्यावेळी फाटलेली जीन्स व ऑफ शोल्डर टॉपमध्ये ती आली होती. तिच्या या गेटअपमुळे ती सोशल मीडियावर ट्रोल झाली होती. असे कपड्यांवरून ट्रोल होण्याची तिची पहिली वेळ नाही. 


दिशा भलेही आता बोल्ड व ग्लॅमरस दिसत असली तरी तिचे बालपणीपासून मॉडेलिंगच्या सुरूवातीच्या दिवसांतील फोटो पाहून तिला ओळखणे कठीण आहे. मॉडेलिंग काळात दिशा खूप वेगळी दिसायची. आता ती खूपच ग्लॅमरस व वेगळी दिसते. दिशाने मॉडेलिंग डेजच्या काळात साडी फोटोशूट केले होते. आधी दिशा इतकी स्लीमट्रीम नव्हती जेवढी आता आहे.


बर्थडे प्लानबद्दल डीएनएशी बोलताना दिशाने सांगितले की, हे खूप ऑकवर्ड असते. अचानक एक दिवस तुम्हाला इतके सारे अटेंशन मिळते. प्रत्येक जण तुम्हाला मेसेज व फोन करत असतात आणि दुसऱ्या दिवशी सगळे काही संपते. तेव्हा तुम्हाला वाटते की अरे हे तर संपले. ही खूप अजब गोष्ट आहे पण मला आठवत नाही की मी माझा बर्थडे सेलिब्रेट केलाय.


दिशाने पुढे सांगितले की, सध्या मी मलंग चित्रपटाचे शूटिंग करत आहे. त्यामुळे मी लेट नाईट कुठे जाऊ शकत नाही. फक्त माझ्या फ्रेंड्ससोबत डिनरला जाणार आहे.


तिला टायगरसोबत काही प्लान आहे का, असे विचारल्यावर ती म्हणाली की, प्रामाणिकपणे सांगू तर काही प्लान नाही. आता मला काहीच माहित नाही, नंतर बघू.


Web Title: Birthday Special: The actress is in limelight with the Tiger's love affair and sometimes the clothes are on
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.